‘मुंबई-पुणे-मुंबई’, ‘प्रेमाची गोष्ट’, ‘ती सध्या काय करतेय’ अशा दमदार चित्रपटांनंतर आता दिग्दर्शक सतीश राजवाडे ‘आपला मानूस’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहेत. नाना पाटेकर यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित झाला आहे. नाना पाटेकर आणि अजय देवगणने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर हा फर्स्ट लूक पोस्ट केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुसळधार पावसात नाना बाईक चालवताना या पोस्टरमध्ये दिसत आहेत. त्यांची भेदक नजर यामध्ये विशेष लक्ष वेधून घेते. त्यासोबतच पोस्टरवरील ‘हा सैतान बाटलीत मावनात नाय’ ही टॅगलाइन नानांच्या भूमिकेविषयी उत्सुकता वाढवत आहे. नवऱ्याच्या वडिलांसोबत राहणाऱ्या, शहरी जीवनशैलीच्या दबावाचा सामना करणाऱ्या आणि नातेसंबंधांची गुंतागुंत हाताळणाऱ्या एका तरुण दाम्पत्याची कथा या चित्रपटातून मांडण्यात आली आहे.

नानांसोबतच सुमीत राघवन, इरावती हर्षे यांच्याही चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. विशेष म्हणजे बॉलिवूड अभिनेता अजय देवगण यामध्ये पाहुण्या कलाकाराच्या भुमिकेत पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट ९ फेब्रुवारी रोजी प्रदर्शत होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: First look of marathi film aapla manus nana patekar ajay devgn satish rajwade