भारताचा आघाडीचा गोलंदाज जसप्रीत बुमराहने अनेक अफवांना शांत करत आजच गुपचूप लग्नगाठ बांधली. 27 वर्षीय बुमराहने आपल्या लग्नाचे फोटोज सोशल मीडियावर शेअर केले. त्याला साजेसं असं कॅप्शनही दिलं. सगळीकडून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षावही होत होता.
पण आपण भारतीय किती उत्सुक असतात ना की बुमराहबद्दल लगेच गुगल सर्च करायला सुरुवात केली. आणि सर्च केलं तरी काय तर बुमराह शिख आहे का? गुगल ट्रेंड्सवर सध्या हा प्रश्न ट्रेंडिंगवर आहे.
भारतीयांना ही उत्सुकता लागून राहिली आहे की जसप्रीत बुमराह मूळचा कोण? शीख की आणखी कोण? बऱ्याच जणांनी त्याच्या मूळ गावाबद्दल, त्याच्या जन्मगावाबद्दलही गुगलकडे चौकशी केल्याचं समोर येत आहे. काहींनी त्याच्या पत्नीबद्दलही सर्च केलेलं दिसत आहे.
पुढे त्याची जात कोणती, त्याचा धर्म कोणता, आजोबा कोण असेही प्रश्न ट्रेंडिंगला दिसून येत आहेत. जसप्रीत बुमराहने संजना गणेशन हिच्याशी लग्न केलं आहे. जसप्रीत कोणाशी लग्न करणार, कोणासोबत त्याचं अफेअर सुरु आहे याबद्दलच्या भरपूर चर्चा सोशल मीडियावर होत होत्या. एका दाक्षिणात्य अभिनेत्रीशीही त्याचं नाव जोडलं जात होतं मात्र आज या चर्चांना लगाम लागला आहे.