बॉलिवूडची अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिच्या सौदर्यांचे करोडो चाहते आहेत. निळ्या डोळ्यांची ही माजी विश्वसुंदरी वयाच्या ४४ व्या वर्षीही तिच्या सौंदर्यांने अनेकांना घायाळ करते. लग्नापूर्वी ऐश्वर्या तिच्या कमनीय आणि सडपातळ बांध्यासाठीही ओळखली जायची. पण, आराध्याच्या जन्मानंतर ती बरीच जाड झाल्याचे पाहायला मिळाले. ऐश्वर्याच्या स्थुलपणावर तेव्हा अनेकांनी टीकाही केली होती. खरंतर मुलीच्या जन्मानंतर निदान काही काळ तरी आपण वजन कमी करण्याकडे लक्ष देणार नसल्याचा खुलासा तेव्हा स्वतः ऐश्वर्यानेच केला होता. मात्र, आता पुन्हा आपल्या कामाकडे वळलेल्या या अभिनेत्रीने वजन कमी करण्याचे ठरवले आहे. विशेष म्हणजे, ‘ऐ दिल है मुश्किल’ आणि ‘जज्बा’मध्ये झळकलेली ही अभिनेत्री त्यासाठी स्लिमिंग ऑइलचा वापर करत असल्याचे म्हटले जातेय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वाचा : … म्हणून ‘केदारनाथ’ चित्रपटातून त्यांची गच्छंती

एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या जन्मानंतर ऐश्वर्याने केरळहून आयुर्वेदिक स्लिमिंग आणि टोनिंग ऑइल मागवण्यास सुरुवात केली. आयुर्वेदिक तेलांनी भरलेले मोठे पाकिट बच्चन यांच्या घरी पोहचवण्यात आले.

‘फॅनी खान’ची सहनिर्माती प्रेरणा अरोरा हिने एका मुलाखतीत चित्रपटाचे शेड्यूल आणि ऐश्वर्या साकारत असलेल्या भूमिकेविषयी माहिती दिली होती. पुढच्या महिन्यात टीम मुंबईमध्ये सेट उभारण्यास सुरुवात करेल. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात अनिल कपूर चित्रीकरणाला सुरुवात करणार असून, त्यानंतर महिनाअखेरपर्यंत ऐश्वर्याही कामाला सुरुवात करेल. चित्रपटाचे पहिले शेड्यूल ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्यात येईल, असे तिने सांगितले होते.

वाचा : … म्हणून तुषार कपूरने मुलाच्या जन्मासाठी सरोगसीचा मार्ग निवडला

ऐश्वर्याच्या भूमिकेविषयी प्रेरणा म्हणाली की, चित्रपटातील ग्लॅमरस आणि स्टायलिश भूमिकेने ऐश्वर्या सर्वांनाच भुवया उंचावण्यास भाग पाडेल. आम्ही दोन महिन्यांपूर्वीच तिला स्क्रिप्ट वाचण्यास दिली होती. त्यावर तिने लगेच चित्रपटात काम करण्यासाठी होकार दिला. प्रेरणाचे हे वक्तव्य पाहता आगामी ‘फॅनी खान’ या चित्रपटात सडपातळ दिसण्यासाठीच ऐश्वर्याने हे आयुर्वेदिक तेल मागवले असण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Is aishwarya rai bachchan using slimming oils for losing weight for fanney khan