सध्या महाराष्ट्रात कोरोनाचा प्रसार पुन्हा वाढताना दिसत आहे. बॉलिवू़डच्या ज्येष्ठ अभिनेत्री किरण खेर यांना करोनाची लागण झाल्याची बातमी नुकतीच मिळाली होती. ही घटना ताजी असतानाच आता एक मराठमोळ्या अभिनेत्रीलाही व्हायरल इन्फेक्शन झाल्याची माहिती समोर आली आहे. या अभिनेत्रीने पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. तसेच तिने सगळ्यांना मास्क वापरण्याचे आवाहनही केले आहे. अभिनेत्रीच्या या पोस्टमुळे चाहत्यांना तिची काळजी वाटू लागली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- “वयाने लहान असलेल्या मुलींबरोबर काम करायला…” सुबोध भावेचे थेट उत्तर

ही मराठमोळी अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून पूजा सावंत आहे. पूजा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रीय असते. आपले नवनवीन फोटो आणि व्हिडिओ शेअर करत पूजा चाहत्यांशी नेहमी जोडलेली असते. पूजाने नुकतीच आपल्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. त्यात एका स्टोरीत पूजा औषध घेताना दिसत आहे तर दुसऱ्या स्टोरीत तिची आई तिला काढा देताना दिसून येत आहे.

हेही वाचा- “इंग्रजी चालणार नाही, मराठीत…” चाहत्याच्या कमेंटवर प्रियदर्शनी इंदलकरचं उत्तर, म्हणाली “हे तुम्ही…”

पूजाला बरं वाटत नाहीये. तिला वायरल इन्फेक्शन झालंय. त्याविषयी तिने सोशल मीडियावर माहिती शेयर केलीय. सर्वांनी काळजी घ्या आणि मास्क लावण्याचं आवाहन देखील तिनं या पोस्टमध्ये केलं आहे. ही पोस्ट पाहून पूजाला तिच्या चाहत्यांनी काळजी घेण्याचं आवाहन केलंय. पूजा सध्या घरी आराम करत असून ती लवकरात पावकर बरी होऊन तिच्या कामाला सुरुवात करेल अशी आशा चाहत्यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा- प्राजक्ता माळीचं सहा वर्षांनी छोट्या पडद्यावर पुनरागमन, ‘या’ मालिकेत साकारणार भूमिका, व्हिडीओत दिसली झलक

पूजाने दगडी चाळ, बोनस, क्षणभर विश्रांती, भेटली तू पुन्हा, लपाछपी, विजेता, नीलकंठ मास्तर अशा सिनेमांमधून अभिनय केलाय. आपल्या मोहक अदा आणि दमदार अभिनयामुळे पूजाच नाव मराठीतील टॉपच्या अभिनेत्रींमध्ये घेतलं जात. अभिनयाबरोबर पूजाचे प्राण्यांवरही तितकेच प्रेम आहे. पेट लव्हर म्हणूनही पूजाला ओळखले जाते. पूजा प्राणी पक्ष्यांशी निगडित विविध सामाजिक संस्थांबरोबर काम करताना दिसते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress pooja sawant has been sick for two days got viral infection appeal to wear mask by instagram post dpj