भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि कॅप्टन कूल अशी ओळख असलेल्या महेंद्रसिंग धोनीने क्रिकेटमध्ये खूप नाव कमावले आहे. धोनी हा जगातील महान खेळाडूंपैकी एक मानला जातो. धोनीच्या कारकिर्दीत अनेक सामने भारताने जिंकले. काही वर्षांपूर्वी धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. पण त्याची लोकप्रियता किंचितही कमी झालेली नाही. क्रिकेटनंतर आता तो त्याची नवी इनिंग सुरु करण्यासाठी सज्ज झाला आहे. नुकतंच ट्वीट करत त्याने त्याच्या चाहत्यांना मोठे सरप्राईज दिले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एम.एस. धोनी हा सोशल मीडियावर सक्रीय असतो. नुकतंच धोनीने त्याच्या अधिकृत ट्वीटवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने त्याच्या चाहत्यांना मोठे सरप्राईज दिले आहे. एम.एस धोनीने त्याच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. त्याचे पहिले मोशन पोस्टरही त्याने शेअर केले आहे.
आणखी वाचा : कंगना रणौतने शेअर केला धोनी आणि कोहलीसोबतचा ‘तो’ फोटो, म्हणाली “मी यापुढे….”

या मोशन पोस्टमध्ये एक मिनी बस, रोड, जंगल, समुद्र असं सर्व काही पाहायला मिळत आहे. त्याबरोबर त्याने LGM असेही लिहिले आहे. या LGM चा अर्थ लेस्ट गेट मॅरिड असा आहे. एम.एस धोनीच्या पहिल्या चित्रपटाचे नाव लेस्ट गेट मॅरिड असे असणार आहे. या चित्रपटात तो निर्माता म्हणून काम करणार आहे.

आणखी वाचा : “मला त्यांच्याबरोबर…” शिंदे गटात प्रवेश करण्याबद्दल अभिजित पानसे स्पष्टच बोलले

धोनीने मनोरंजन क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी तमिळ चित्रपटाची निवड केली आहे. धोनी एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडने त्याच्या पहिल्या हिंदी चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर केले आहे. एमएस धोनी निर्मित या चित्रपटात तमिळ चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अभिनेते हरीश कल्याण, इवाना, नादिया आणि योगी बाबू हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन रमेश थमिलामनी करत आहेत. एमएस धोनीच्या पहिल्या चित्रपटाचे पोस्टर समोर अनेक चाहत्यांनी त्याचे कौतुक केले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ms dhoni debut in entertainment industry with tamil film lets get married directed by ramesh thamilmani nrp