दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य हा नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतो. नागा चैतन्य हा लवकरच अभिनेता आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. सध्या तो या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. तर दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून तो त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. घटस्फोट झाल्यानंतर नागा चैतन्य हा एका प्रसिद्ध अभिनेत्रीला डेट करत असल्याचे बोललं जात आहे. नुकतंच त्याने याबद्दल उत्तर दिले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागा चैतन्य आणि दाक्षिणात्य अभिनेत्री शोभिता धुलीपाला सध्या रिलेशनशिपमध्ये आहे. अनेकदा त्या दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आले होते. सध्या नागाचैतन्य हा लाल सिंग चड्ढा या चित्रपटामुळे प्रसिद्ध आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने नुकतंच त्याने आरजे सिद्धार्थ कन्नन याला मुलाखत दिली. त्यावेळी त्याला अभिनेत्री शोभिता धुलीपालाबद्दलचा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्याने फारच हटके शब्दात उत्तर दिले आहे.

“जर ती आनंदी असेल तर…”, घटस्फोटानंतर पहिल्यांदाच नागाचैतन्यने सोडले मौन

सिद्धार्थच्या या प्रश्नावर उत्तर देताना नागाचैतन्यने हसत हसत उत्तर दिले. मी यावर फक्त हसणार आहे, असे त्याने यावर उत्तर देताना म्हटले. याआधीही नागा चैतन्यला ई-टाइम्सला मुलाखतीत याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्याने समांथाचे नाव घेत उत्तर दिले. आमच्या बाबतीत समांथा आता फार पुढे गेली आहे आणि मी देखील पुढे गेलो आहे. पण मला त्याबद्दल जगाला अधिक सांगू इच्छित नाही.’

दरम्यान समांथा आणि नागा चैतन्य ऑक्टोबर २०१७ मध्ये दोघेही विवाहबंधनात अडकले. २००९ मध्ये ‘ये माया चेसावे’ या तेलुगू चित्रपटाच्या सेटवर समांथा व नागा चैतन्यची पहिली भेट झाली. त्यावेळी नागा चैतन्य कमल हासन यांची मुलगी श्रुती हसनला डेट करत होता. तर दुसरीकडे समांथा व ‘रंग दे बसंती’ फेम अभिनेता सिद्धार्थ रिलेशनशीपमध्ये होते. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान समांथा व नागा चैतन्यमध्ये चांगलीच मैत्री झाली.

२०१५ मध्ये ‘ऑटोनगर सूर्या’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जेव्हा हे दोघं पुन्हा भेटले तेव्हा दोघांचाही ब्रेकअप झाला होता. याच चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान समांथा व नागा चैतन्य एकमेकांच्या प्रेमात पडले असं म्हटलं जातं. ऑक्टोबर २०१७ मध्ये हे दोघं विवाहबंधनात अडकले. लग्नाच्या जवळपास ४ वर्षांनंतर त्यांनी घटस्फोट घेतला.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Naga chaitanya reacts to dating rumours with sobhita dhulipala nrp