‘फॅमिली मॅन’सारखी जबरदस्त हीट वेबसीरिज देणारे दिग्दर्शक राज आणि डीके यांची ‘फर्जी’ ही नवी वेबसीरिज प्रदर्शित झाली आहे. यामध्ये शाहिद कपूर मुख्य भूमिकेत आहे. या वेबसीरिजचे सर्वत्र कौतुक होत आहे. शाहिद आणि विजय सेतुपती यांच्या अभिनयाची प्रशंसा केली जात आहे. प्राइम व्हिडिओवरील सर्वात जास्त पाहिली गेलेली वेबसीरिज म्हणून ‘फर्जी’ने रेकॉर्डही केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

खोट्या चलनी नोटा बनवणाऱ्या एका मोठ्या रॅकेटबद्दल आणि एकूणच या गुन्ह्याबद्दल या वेबसीरिजमध्ये फार उत्तमरित्या भाष्य केलं गेलं आहे. शिवाय या सीरिजचे निर्माते राज आणि डीके यांच्या ‘द फॅमिलीमॅन’ या वेबसीरिजशी याचं कनेक्शन जोडल्याने चाहते याच्या पुढच्या सीझनसाठी आणखीनच उत्सुक आहेत.

आणखी वाचा : ‘पठाण’नंतर आता बॉलिवूडमध्येही अनुभवता येणार युनिव्हर्स; ‘या’ ५ सिनेमॅटिक युनिव्हर्ससाठी प्रेक्षक उत्सुक

नुकतंच एका मुलाखतीदरम्यान शाहिद कपूरने ‘फर्जी’च्या दुसऱ्या सीझनबद्दल भाष्य केलं आहे. शाहिद म्हणतो, “नक्कीच फर्जीचा दूसरा सीझन येणार, पण कधी ते मलाही ठाऊक नाही. अशा गोष्टींसाठी खूप वेळ लागतो. एखादी सीरिज शूट झाली की ती ३५ ते ४० भाषांमध्ये डब करून २०० पेक्षा अधिक देशात ती प्रदर्शित केली जाते, त्यामुळे यासाठी बराच वेळ लागतो. त्यामुळे जेव्हा ‘फर्जी २’चं शूटिंग जेव्हा पूर्ण होईल त्यानंतर वर्षभराने नवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

‘फर्जी’ प्रदर्शित झाल्यानंतर चाहत्यांनी तिला चांगली पसंती दिली आहे. १० फेब्रुवारी रोजी ही वेबसीरिज प्राइम व्हिडिओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली. या वेब सीरिजमध्ये शाहिद कपूर आणि विजय सेतुपती प्रमुख भूमिकेत आहेत. त्याचबरोबर राशी खन्ना, रेजिना कॅसांड्रा, के के मेनन, कुब्ब्रा सैत आणि इतर अनेकजण सहाय्यक भूमिकेत आहेत.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shahid kapoor says farzi season will definitely happen but it will take time avn