अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हिच्या आत्महत्येसाठी तिचा प्रियकर राहुल राज सिंग कारणीभूत असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणताही पुरावा सापडलेला नाही. तसेच, पोलिसांनी नुकतीचं राहुलची चौकशी केली असून त्याचा जबाब नोंदवून घेतला आहे.
पिंकविला या संकेतस्थळाच्या माहितीनुसार, प्रत्युषाने गळफास घेतलेल्याचे निदर्शनास आले तेव्हा घटनास्थळी उपस्थित असणा-यांमध्ये राहुल होता. त्यानंतर त्याने लगेच शेजा-यांना बोलावून त्यांच्या मदतीने प्रत्युषाला रुग्णालयात नेले.  तिथेच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. प्रत्युषाच्या आत्महत्येनंतर प्रतिक्रिया देताना राहुल म्हणाला की, आम्ही दोघे राहत असलेल्या घराच्या दोन किल्ल्या होत्या. त्यापैकी एक किल्ली माझ्याकडे तर दुसरी किल्ली प्रत्युषाकडे होती. जेव्हा मी बेडरुममध्ये प्रवेश केला तेव्हा प्रत्युषाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मी पाहिले. तेव्हा मी घाबरुन गेलो होतो. त्यानंतर लगेच मी आमच्या शेजा-यांना बोलावून घेतले आणि त्यांच्या मदतीने प्रत्युषाला कोकिलाबेन रुग्णालयात घेऊन गेलो. आम्हाला वाटले की ती अजूनही जिवंत आहे. पण तसे झाले नाही. मी इतका घाबरलो होतो की पोलिसांना याबाबत काही कळवू शकलो नाही. रुग्णालयानेच याबाबतची माहिती पोलिसांना दिली. डॉक्टरांनी प्रत्युषाच्या निधनाची माहिती दिल्यानंतर मी तिच्या कुटुंबियांना आणि मित्रमंडळींना सदर घटनेबाबात कळवले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pratyusha banerjees boyfriend rahul raj singh gives his first statement on her suicide