भारताला यंदाच्या ऑस्कर सोहळ्यामध्ये दोन पुरस्कार मिळाले. ‘नाटू नाटू’ व ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ यासाठी भारताने ऑस्कर जिंकले. ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ला बेस्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्मचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. या लघुपटाच्या निर्मात्या गुनीत मोंगा यांची सध्या चांगलीच चर्चा आहे. नुकत्याच गुनीत मोंगा या ऑस्कर जिंकल्यावर भारतात परतल्या. तेव्हा थाटात त्यांचं स्वागत केलं गेलं आणि ते फोटोसुद्धा चांगलेच व्हायरल झाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गुनीत यांनी ऑस्कर जिंकल्याने साऱ्या भारतीयांचं उर अभिमानाने भरून आलं. परंतु पुरस्कार स्वीकारल्यावर मंचावर गुनीत यांना भाषण द्यायची संधी मिळाली नाही याची त्यांनी खंत व्यक्त केली आहे. दिग्दर्शिका कार्तिकी गोन्साल्वीस हिला भाषण द्यायची संधी मिळाली पण गुनीत जेव्हा बोलायला येणार तेव्हा जोरात म्युझिक वाजलं आणि त्यांना नाईलाजाने मंचावरुन खाली उतरावं लागलं. गुनीत यांच्यानंतर एका अमेरिकन चित्रपटाला पुरस्कार देण्यासाठी हे म्युझिक मंचावर ऐकू आलं, त्या चित्रपटाशी जोडलेल्या दोन्ही लोकांना बोलायची पूर्ण संधी दिली गेली.

आणखी वाचा : “इंडस्ट्रीत बलात्कार होत नाहीत, तर…” अभिनेत्री शिल्पा शिंदेचा कास्टिंग काऊचबद्दल खुलासा

गुनीत यांना मिळालेल्या वागणुकीमुळे बरीच लोक नाराज आहेत, काहींनी गुनीत या रंगभेदाला बळी पडल्याचाही दावा केला आहे. गुनीत यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये मंचावर भाषण करू न दिल्याबद्दल खंत व्यक्त केली आहे. मुयलखतीमध्ये गुनीत म्हणाल्या, “पुरस्कार मिळाल्यानंतर मला मंचावर बोलायची संधी न मिळाल्याने वाईट वाटलं आहे. हा एक भारतीय निर्मिती संस्थेचा चित्रपट आहे ज्याला ऑस्कर मिळाला आहे आणि ही गोष्ट अधोरेखित व्हायला हवी. ही आपल्या देशासाठी मिळालेली एक संधी होती जी माझ्यापासून हिरावून घेण्यात आली.”

गुनीत यांना मंचावर बोलायची संधी मिळाली नसली तरी नंतर प्रेस रूममध्ये त्यांना त्यांचं पूर्ण भाषण देण्याची संधी मिळाली. त्यावेळी गुनीत यांनी मानमोकळेपणाने त्यांची बाजू मांडली. इतकंच नव्हे तर या मुलाखतीदरम्यान त्यांनी शपथ घेतली की पुन्हा जेव्हा केव्हा त्या ऑस्कर जिंकतील तेव्हा त्या नक्कीच त्यांचं भाषण त्या मंचावर देतील. ३९ वर्षांच्या गुनीत मोंगा या सिख्या एंटरटेनमेंटच्या संस्थापक व सीईओ आहेत. त्यांनी आतापर्यंत ‘पगलैट’, ‘द लंचबॉक्स’ आणि ऑस्कर विजेता शॉर्ट डॉक्यूमेंटरी ‘पीरियड अँड ऑफ सेंटेंस’ची निर्मिती केली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Producer of the elephant whisperers guneet monga speaks about oscar experience and speech avn