पुण्यात एका फुटबॉल सामनादरम्यान अभिनेता रणबीर कपूरच्या पायाला दुखापत झाली असून जवळच्या रुग्णालयात त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आलं. या प्रदर्शनीय फुटबॉल सामन्यात रणबीरसोबतच अभिषेक बच्चन, शब्बीर आहलुवालिया, करण वाही, अरमान जैन, आदर जैन, इशान खट्टर, जिम सर्भ यांसारखे बऱ्याच सेलिब्रिटींनी सहभाग घेतला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सूत्रांच्या माहितीनुसार, रणबीरच्या उजव्या पायाला दुखापत झाली असून डॉक्टरांनी त्याला आराम करण्याचा सल्ला दिला आहे. मात्र लगेच दुसऱ्या दिवशी तो एका शूटिंगसाठी गोव्याला रवाना झाला.

रणबीरला फुटबॉल खेळणं फार आवडतं हे अनेकांनाच ठाऊक आहे. अनेकदा अभिषेक बच्चनसोबत त्याला सराव करताना पाहिलं गेलं आहे. या दोघांनी मिळूनच फुटबॉलच्या प्रदर्शनीय सामन्यासाठी सेलिब्रिटींची टीम तयार केली. पुण्यात हा सामना खेळला गेला आणि त्यामध्ये अभिषेकच्या टीमने बाजी मारली.

वाचा : ‘बॉलिवूडमध्ये लैंगिक अत्याचाराच्या घटना घडतात पण..’

रणबीरच्या चित्रपटांविषयी बोलायचं झाल्यास, त्याचा बहुचर्चित ‘संजू’ हा चित्रपट २९ जून रोजी प्रदर्शित होत आहे. अभिनेता संजय दत्तच्या जीवनावर आधारित या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेनं वाट पाहत आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranbir kapoor rushed to hospital after getting injured while playing football in pune