अभिनेता रणवीर सिंग आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी यांची जोडी लोकप्रिय आहे. रणवीर आणि रोहित शेट्टीने सिंबा या चित्रपटात एकत्र काम केले होते. सिंबा या चित्रपटाला दोन वर्ष पूर्ण झाल्याने रणवीरने इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. मात्र हा फोटो सिंबाच्या सेटवरचा नसून त्याच्या आगामी चित्रपटाच्या सेटवरचा असल्याने सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हायरल झालेला हा फोटो रणवीरने इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. हा फोटो सर्कस या चित्रपटाच्या सेटवरचा आहे. या फोटोमध्ये रणवीर उत्साहाने रोहित शेट्टीकडे पाहताना दिसत आहे. रोहित शेट्टीच्या हातात वॉकीटॉकी आहे. तर रणवीरने टोपी, गळ्यात स्कार्फ आणि मरुन रंगाचा टी-शर्ट आणि खाकी रंगाची पॅंट परिधान केली आहे. हा फोटो शेअर करत तो म्हणाला की, “सर्कसच्या सेटवर सिंबा २ ची फील्डिंग.”

आणखी वाचा : प्रिन्स हॅरी-मेगन मार्कलला मागे टाकत ‘हे’ ठरले ‘पॉवर कपल’

सर्कस या चित्रपटात रणवीर सोबत पूजा हेगडे, जॅकलिन फर्नांडिस, वरुण शर्मा, सिद्धार्थ जाधव, जॉनी लीव्हर, संजय मिश्रा कलाकार आहेत. रणवीर या चित्रपटात दुहेरी भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट २०२१ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranveer singh shared a bts photo from the set of cirkus dcp