आपल्या नवनव्या भूमिका आणि लूकने प्रेक्षकांना थक्क करणारा अभिनेता रणवीर सिंग सध्या त्याच्या आगामी ‘सिंबा’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित या चित्रपटात तो एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार असून त्याचा फर्स्ट लूक नुकताच रणवीरने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा लूक पाहता रणवीर बॉलिवूडचा नवा ‘सिंघम’ ठरतोय की काय असा प्रश्न तुम्हालाही नक्कीच पडेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रणवीरचा पोलीस अधिकाऱ्याचा लूक नेटकऱ्यांना भावला असून या फोटोला लाखो लाईक्स मिळाले आहेत. ‘रोहित शेट्टी का हिरो..’ असं कॅप्शन देत बॉलिवूडच्या बाजीरावने हा फोटो शेअर केला आहे. ‘सिंबा’मध्ये रणवीर संग्राम भालेराव ही भूमिका साकारणार असून सैफ अली खानची मुलगी सारा अली खानसुद्धा यामध्ये झळकणार आहे. सारा आणि रणवीर पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार असल्याने ही नवीन जोडी प्रेक्षकांना किती पसंत पडते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

वाचा : ‘क्वांटिको’ वादावर प्रियांकाने सोडलं मौन

‘सिंबा’ हा दाक्षिणात्य चित्रपटाचा हिंदी रिमेक असून सध्या हैदराबादमध्ये याची शूटिंग सुरू आहे. २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘टेम्पर’ या तेलुगू चित्रपटाचा हा रिमेक आहे. २८ डिसेंबर रोजी रणवीर- साराचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranveer singh shares first look from rohit shetty movie simmba