लवकरचं रविना टंडनची पोस्ट बदलणार आहे…. नाही कळलं ना.. बॉलीवूडची एकेकाळची आघाडीची अभिनेत्री आता सासू होणार आहे. रविनाने दत्तक घेतलेल्या मुलींपैकी एक असलेली तिची मुलगी छाया गोव्यात २५ जानेवारीला विवाहबंधनात अडकणार आहे.
रविनाने ट्विटरद्वारे याबद्दल माहिती दिली. तिने म्हटले की, या आठवड्यात पूर्ण हल्ला गुल्ला  होणार आहे. माझ्या मुलीच्या लग्नासाठी मी गोव्याला जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा


रविनाच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंदू-ख्रिश्चन पद्धतीने गोव्यात विवाहसोहळा पार पडेल. ९०च्या दशकात गाजलेल्या या अभिनेत्रीने त्यावेळी दोन मुलींना दत्तक घेतले होते. त्यापैकी मोठी मुलगी पूजा हिने २०११ साली विवाह केला. रविनाने चित्रपट वितरक अनिल थंदानी याच्याशी विवाह केला असून त्यांना मुलगी राशा आणि मुलगा रणबीर ही दोन मुले आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raveena tandons younger daughter chhaya to tie the knot