अभिनेता सलमान खान लॉकडाउनचा काळ सुरु झाल्यापासून पनवेल येथील फार्महाऊसवर आहे. संपूर्ण कुटुंबासोबत सलमान येथे वेळ घालवत असून फावल्यावेळात शेती कामात तो त्याचं मन रमवताना दिसत आहे. सध्या सलमान सोशल मीडियावर त्याच्या शेतातील कामाचे काही व्हिडीओ,फोटो शेअर करत असून त्याने पुन्हा एक नवीन व्हिडीओ शेअर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अलिकडेच सलमानने शेतात लावणी करताना आणि चिखलात बसलेला असे दोन फोटो शेअर केले होते. त्यानंतर आता त्याने आता ट्रॅक्टर चालवतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या त्याचा हा व्हिडीओ चाहत्यांमध्ये लोकप्रिय ठरत असून हा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.
या व्हिडीओमध्ये सलमान स्वत: ट्रॅक्टर चालवताना दिसत आहे. तसंच मध्येच उतरुन तो शेताची न्याहाळणी करत आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्याने शेती असं कॅप्शन दिलं आहे.


दरम्यान, यापूर्वीदेखील सलमानने शेतात काम करतानाचे काही फोटो शेअर केले होते. सलमान सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो, व्हिडीओज, ट्विट्स यांच्या माध्यमातून तो कायम आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहातो.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khan farming in rain actor drives tractor video viral on internet ssj