सलमान खान सध्या साजीद नाडियदवाला दिग्दर्शित ‘किक’ चित्रपटाच्या कामात व्यस्त आहे. पण, ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्रालयाने त्याचा व्हिसा फेटाळल्याने त्याला  ग्लासगो येथे चित्रपटाच्या चित्रिकरणाकरिता जाता आले नाही. मात्र, सलमानने व्हिसासाठी पुन्हा अर्ज केला असून लवकरच त्याला व्हिसा मिळण्याची शक्यता आहे.
सलमान भारतात असल्यामुळे दिग्दर्शकाला चित्रिकरणात अडथळा निर्माण होत आहेत. त्यामुळे नाडियदवाला अगोदर रणदीप हुड्डासोबतचे काम पूर्ण करुन काही दृश्यांसाठी सलमानऐवजी त्याच्या बॉडी डबलचा वापर करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. साजिद नाडियादवाला ‘किक’ या चित्रपटात सलमानबरोबर जेकलीन फर्नांडिस दिसणार आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khan will get his uk visa soon