देशभरात आज होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. बॉलिवूड सेलिब्रिटी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून देशवासियांना होळीच्या शुभेच्छा देत आहेत. दरम्यान बॉलिवूडचे शोमॅन सुभाष घई यांनी आपल्या अनोख्या अंदाजात होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी शाहरुख खानचा होळी खेळतानाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
NOSTALGIA MUKTA ARTS
HAPPY HOLI @MuktaArtsLtd @MuktaA2Cinemas @Whistling_Woods
SRK , Gauri n friends at subhash ghai’s HOLI party in meghna cottage , mud island mumbai in 2000https://t.co/ZwmUDNsMFf.
— Subhash Ghai (@SubhashGhai1) March 10, 2020
दिग्दर्शक सुभाष घई यांनी २० वर्षांपूर्वी आपल्या घरी होळी निमित्त एक खास पार्टी आयोजित केली होती. या होळी सेलिब्रेशनला अनेक नामांकित कलाकारांनी हजेरी लावली होती. या पार्टीत शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान यांनी मात्र सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. त्या सेलिब्रेशनची आठवण सुभाष घई यांना यंदाच्या होळीच्या निमित्ताने आली. त्यांनी २००० सालचा हा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट करत सर्वांना होळीच्या शुभेच्छा दिल्या.
यापूर्वी आमिर खान, सलमान खान, ऋषी कपूर, करिना कपूर यांसारख्या अनेक बॉलिवूड कलाकारांनी होळी निमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या.