एका सच्च्या कलाकाराला त्याच्या अंगी असलेले गुण आणि कौशल्य जगासमोर दाखवण्यासाठी एका माध्यमाची आणि पाठिंब्याची गरज असते. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील मंगली गायन क्षेत्रातील नवीन आकर्षण बनली आहे. मंगलीचे मूळ नाव सत्यवती मुडावत, जन्म आंध्रप्रदेश सध्या तेलंगण राज्यातला. मंगलीचा यशाच्या मार्गाकडे होणारा प्रवास आता लवकरच आणखी एका नव्या आणि वेगळ्या वळणावर येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनेकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण करणारी मंगली ही अप्रतिम गायिका तर आहेच पण त्याचबरोबर ती सुंदर अभिनेत्री देखील आहे. आणि आता ती लवकरच मराठी सिनेमात पदार्पण करणार आहे. संजीवकुमार राठोड निर्मित आणि दिग्दर्शित ‘आमदार निवास’ या आगामी मराठी चित्रपटात मंगली आपल्या गोड आवाजाचा आणि अभिनयाचा ठसा उमटवणार आहे. ‘कती तू बंजारा’ या गाण्यामार्फत मंगली आपला मराठमोळा प्रवास सुरु करत आहे. ‘कती तू बंजारा’ हे गाणं प्रसिद्ध ‘गीतांजली’ या गोर बंजारा अल्बममधील आहे. ९०च्या दशकात या अल्बमने अक्षरश: धुमाकूळ घातला होता.

मंगलीचा संघर्ष

मंगलीच्या आई-वडिलांना १२ वर्षे कोणतेही अपत्य नव्हते. दवाखाना, वैद्य, नवस, पूजा, मंदिर हे करत करत शेवटी १२ वर्षानंतर त्यांना मंगलीच्या रुपाने मुलगी झाली. या १२ वर्षाच्या तपाची सर्वात मोठी गोष्ट म्हणजे मंगलीच्या आईने १२ वर्षे आपल्या पायात चप्पल घातली नाही. पण एवढ्या तपानंतरही मुला ऐवजी मुलगी झाली याचा राग तिच्या आईला आला व तीन दिवस तिने मंगलीपासून तोंड फिरवले. पण सुदैवाने, मंगलीला साथ मिळाली आपल्या मधुर आवाजाची. तोच वारसा मंगलीने जपला व संगीत आणि कला क्षेत्रात आपली कारकिर्द घडविण्याचा निश्चय केला. कलेला गुणवत्ता व परिश्रमाबरोबर शिक्षणाची साथ मिळावी म्हणून मंगलीने कर्नाटक म्युझिकमध्ये एस.व्ही.युनिव्हर्सिटीमध्ये डिप्लोमा केला.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: South indian actress and singer mangali debut in marathi ssv