काही दिवसांपूर्वी बॉलिवूडची देसी गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्रियांका चोप्राने Priyanka Chopra पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi यांची भेट घेतली होती. तिने परिधान केलेल्या ड्रेसवरुन वाद निर्माण झाला होता. यावरुन प्रियांका चोप्राला सोशल मीडियात ट्रोलदेखील करण्यात आलं होतं. पण प्रियांकाच्या समर्थनार्थ आता बॉलिवूडची बेबी डॉल सनी लिओनी मैदानात उतरली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सनी लिओनीने प्रियांकाचं समर्थन करताना म्हटले की, ‘जर पंतप्रधान मोदींना प्रियंकाच्या ड्रेसवरुन काही आक्षेप नव्हता. तर यावरुन इतका वाद का निर्माण केला जात आहे?’ असा प्रतिप्रश्नच सनीने टीकाकारांना विचारला. एवढंच बोलून ती थांबली नाही तर ती म्हणाली की, ‘आपण देशाच्या पंतप्रधानपदासाठी सर्वोत्कृष्ट व्यक्तीची निवड केली आहे. जर त्यांना यावर आक्षेप असला असता, तर त्यांनी तो व्यक्त केला असता. पण त्यांनी यावर कोणताही आक्षेप नोंदवला नाही. त्यामुळे एखाद्या व्यक्तीवर एवढं बोलण्याचा कोणाला काहीही अधिकार नाही.’

अमिताभ यांचे ५ प्रसिद्ध संवाद आणि पोलिसांचा सतर्कतेचा इशारा….

सनी पुढे म्हणाली की, ‘कोणाच्याही कपड्यांवरून त्यांचं मुल्यांकन करणं योग्य नाही. प्रियांका एक संवेदनशील महिला आहे, तिला समाजाची जाणही आहे. तिच्या कपड्यांबद्दल बोलण्यापेक्षा तिच्या कामाबद्दल बोलणं केव्हाही चांगलं.’

काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांनाही प्रियांका आणि मोदी यांच्या भेटीबद्दल त्यांचे मत विचारण्यात आले होते. पण मी प्रियांका नाही किंवा मोदीही नाही त्यामुळे यावर मी काय बोलणार असे उत्तर देऊन त्यांनी हा अप्रत्यक्षपणे हा प्रश्न टाळला होता.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunny leone lets judge priyanka chopra for her actions not clothes