आज दुपारी बाराच्या सुमारास केदारनाथ या सिनेमाचा टिझर येणार आहे. या सिनेमात सुशांत सिंग राजपूत आणि सारा अली खान यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी या सिनेमाचे एक पोस्टर ट्विट केले आहे. तसेच याच ट्विटमध्ये त्यांनी ही माहिती दिली आहे की या सिनेमाचा टिझर आज दुपारी बारा वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Kedarnath… Teaser out at 12 noon tomorrow… Directed by Abhishek Kapoor…

सारा अली खान ही सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची मुलगी आहे. सैफची मुलगी या सिनेमातून पदार्पण करते आहे. हा सिनेमा ७ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. अभिषेक कपूरने या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. सारा अली खानला प्रेक्षक स्वीकारतील का हे हा सिनेमा प्रदर्शित झाल्यावरच ठरणार आहे. रॉनी स्क्रूवाला आणि प्रज्ञा कपूर यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. केदारनाथ ही एक प्रेमकहाणी आहे. २०१३ मध्ये उत्तराखंडमध्ये जो महापूर आला त्याचाही संदर्भ या प्रेमकथेला असणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sushant singh rajput sara ali khans kedarnath to release on december 7 teaser out on october