पिंक गर्ल तापसी पन्नूचा ‘नाम शबाना’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. तापसीचा हा चित्रपट २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या अक्षय कुमारच्या ‘बेबी’ चित्रपटाचा प्रीक्वल आहे. त्यामुळेच तापसीच्या चित्रपटातील भूमिकेचे कौतुक होत असताना चित्रपटाची तुलना ही अक्षय कुमारच्या ‘बेबी’ या चित्रपटाशी होताना दिसते. आपल्या चित्रपटाची अक्षय कुमारसोबत होणारी तुलना तापसीला अजिबात रुचलेली नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अक्षयच्या चित्रपटासोबत होणाऱ्या तुलनेबद्दल तापसी म्हणाली की, अक्षय कुमारची मुख्य भूमिका असलेल्या ‘बेबी’ चित्रपटासोबत माझ्या चित्रपटाची तुलना करणे अयोग्य आहे. या दोन चित्रपटाची तुलनाच होऊ शकत नाही. ‘बेबी’ चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत आहे. या क्षेत्रात माझी आता सुरुवात असून, मी फक्त ३ ते ४ चित्रपट केले आहेत. त्यामुळे चित्रपटाची सुपरस्टारसोबत तुलना करणे अयोग्य आहे.” अक्षय या चित्रपटाच्या प्रसिद्धीला आल्याची आठवण करुन देताना तापसीने अक्षयच्या चित्रपटाशी तुलना करण्यापेक्षा स्त्रीप्रधान कथानकाच्या नजरेतून पाहणे योग्य ठरेल, असे ती म्हणाली.

अॅक्शन चित्रपटाची सर्वत्र चर्चा रंगत असताना तिच्या कुटुंबियांकडून देखील तिला कौतुकाची थाप पडली. तिच्या कुटुंबियांना या चित्रपटातील तापसीची भूमिका फारच आवडली आहे. कुटुंबियांकडून मिळालेल्या कौतुकाबद्ल तापसी म्हणाली की, “चित्रपटाचा पहिला शो मी कुटुंबियांसोबतच पाहिला. तुला आता अभिनय जमायला लागला आहे, अशा शब्दांत आईने कौतुक केले. आतापर्यंतच्या माझ्या अनेक चित्रपटांपैकी ‘नाम शबाना’मधील भूमिका कुटुंबियांना सर्वोत्तम वाटली.” मुलाखतीमध्ये बोलताना तापसी पन्नूने ‘बाहूबली २’चा दाखला देत दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी जगभरात देशाला नवी ओळख निर्माण करुन देत असल्याचे म्हटले. तामिळ चित्रपटसृष्टीतून पदार्पण केल्याचा अभिमान असल्याचे देखील तिने सांगितले.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Taapsee pannu unfair to compare naam shabana with akshay kumar baby