‘बिग बॉस मराठी ३’ फेम जय दुधाणे सोशल मीडियावर खूप चर्चेत असतो. तो एमटीव्ही वरील अतिशय लोकप्रिय कार्यक्रम ‘स्प्लिट्सविला’मध्येही झळकला होता. जय सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर सिमरन बावाला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. तो मागच्या काही वर्षांपासून सिमरनला डेट करत असल्याचं म्हटलं जातं, पण तो आतापर्यंत कधीच त्याबद्दल बोललेला नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Video: “गॉगल लावून कोण जातं?” प्रदीप सरकार यांच्या अंत्यदर्शनाला गेलेली दीपिका पदुकोण ट्रोल; नेटकरी म्हणाले, “शूटिंग…”

अलीकडेच जय दुधाणने इन्स्टाग्रामवर त्याच्या चाहत्यांसाठी ‘आस्क द क्वेश्चन’ हे सेशन ठेवलं होतं. त्यात त्याने त्याचे चाहते कोणतेही प्रश्न विचारू शकतात, असं म्हटलं होतं. तसेच चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची जयने उत्तरंही दिली. एका चाहत्याने जयला त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल विचारले आणि गूगल सिमरन बावाला त्याची गर्लफ्रेंड का दाखवते, असा प्रश्न विचारला. त्यावर जयने उत्तर दिलं.

युजरने विचारले, “सिमरन बावा तुझी गर्लफ्रेंड असल्याचे गुगल का दाखवते? खऱ्या आयुष्यात तर ती संजय पांडेला डेट करत आहे.” जयने त्याच्या चाहत्याच्या प्रश्नावर प्रतिक्रिया दिली आणि त्याला “Whattt??? Like whaaatttt??? ती संजय पांडेला डेट करत आहे??? संजय पांडे, हे पाहावं लागेल ब्रो..सिमरन बावा” असं उत्तर दिलं.

जय दुधाणेची इन्स्टाग्राम स्टोरी

दरम्यान, जय दुधाणे लवकरच महेश मांजरेकरांच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या सिनेमात दिसणार आहे. त्याचप्रमाणे जयचा ‘गडद अंधार’ हा चित्रपट देखील रिलीज झाला आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi 3 fame jay dudhane reacts about his relationship with simran bawa hrc