‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेले हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर कायमच चर्चेत असतात. मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोड्यांपैकी एक जोडी म्हणून त्यांना ओळखले जाते. दोघेही सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हार्दिकने पत्नी अक्षयाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- ‘द कपिल शर्मा शो’मध्ये प्रेक्षक म्हणून सहभागी होण्यासाठी मोजावे लागतील ४ हजार ९९९ रुपये? सत्य सांगत कपिल म्हणाला…

हार्दिक जोशी म्हणाला, “मी खूप साधा राहतो. मला माणसांत रहायला आवडतं. आपण नेमक कसं दिसतोय हे समोरचा आपल्या नीट सांगू शकतो. त्यामुळे माझी आई आणि अक्षया मला तयार होताना नेहमी मदत करत असतात. प्रसंगी ते मला काय घातलय असं म्हणून ओरडतातही. कलाकार असल्यामुळे प्रेक्षक आपल्याला फॉलो करत असतात. प्रेक्षकांना मी कसा बघायला आवडेन याचा मी आभ्यास करत असतो. मी जे कपडे घालतो ते बघून सामान्य माणून किंवा प्रेक्षकांना वाटलं पाहिजे की आपणही हे कपडे घालू शकतो. त्यामुळे मी नेहमी साधं राहतो.”

हार्दिक पुढे म्हणाला “आपण कितीही परफेक्ट असलो तरी बायकोसमोर परफेक्ट नसतो. अक्षया पहिल्यापासूनच मला सगळ्या गोष्टींमध्ये मदत करत आली आहे. मला हे आवडतं कारण प्रत्येकाची टेस्ट वेगळी असते. माझ्या प्रत्येक लूकमध्ये ९९ टक्के माझी आणि अक्षयाचा हात असतो.”

हेही वाचा- “१४ वर्ष अयशस्वी करिअर…” ‘तुझेच मी गीत गात आहे’ फेम तेजस्विनी लोणारीला स्वामींची आली अशी प्रचिती, म्हणाली…

दरम्यान, ‘तुझ्यात जीव गुंतला’ या मालिकेमुळे हार्दिक-अक्षया प्रसिद्धीझोतात आले होते. या मालिकेत हार्दिकने राणादा, तर अक्षयाने अंजली पाठक ही भूमिका साकारली होती. राणादा आणि पाठकबाईंच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. मालिका संपल्यावर काही महिन्यातच दोघांनीही गुपचूप साखरपुडा उरकत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता.हार्दिक हा लवकरच ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटात झळकणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hardeek joshi talk about wife akshaya deodhar actor said nobody is perfect in front of wife dpj