अभिनेता शशांक केतकर हा त्याच्या अभिनयासाठी ओळखला जातो. त्याच्या अनेक भूमिका लोकप्रिय ठरल्या आहेत. सध्या तो स्टार प्रवाह वाहिनीवरील मुरांबा (Muramba) या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या मालिकेत तो अक्षय ही भूमिका साकारताना दिसत आहे. अक्षयच्या स्वभावाच्या विविध छटा आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याच्या माणसांसाठी प्रेमळ असणारा आणि त्याच्या कुटुंबाला त्रास देणाऱ्यांसाठी रागीट, उद्धट, तर कधी हळवा, स्वत:च्या माणसांना गमावण्याची भीती असणारा अशा अक्षयच्या भूमिकेतील विविध छटा पाहायला मिळतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘मुरांबा’ मालिकेत काही दिवसांपासून अनेक नाट्यमय गोष्टी घडताना पाहायला मिळत आहेत. रेवाला तुरुंगात पाठविल्यानंतर अक्षय व रमाने एका नवीन आयुष्याला सुरुवात केली होती. मात्र, त्यादरम्यानच रमाला अपघात झाला आणि ती दरीत पडली. या घटनेचा अक्षयवर खोल परिणाम होऊन, त्याला धक्का बसला होता. त्याची ढासळणारी प्रकृती पाहिल्यानंतर त्याच्या आईला म्हणजेच सीमाला त्याची काळजी वाटत होती. त्याचदरम्यान तिने माहीला पाहिले. माही अगदी रमासारखी दिसत असल्याचे लक्षात आल्यानंतर तिने तिला रमा बनून मुकादमांच्या घरी राहण्याची विनंती केली. जेव्हा माहीला ही गोष्ट लक्षात आली की, तिच्यामुळेच रमाचा अपघात झाला आहे, त्यावेळी तिने रमाचे रूप घेऊन मुकादमांच्या घरात राहण्यास होकार दिला. आता माही रमाच्या रूपात मुकादमांच्या घरी राहत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता मात्र, समोर आलेल्या प्रोमोमध्ये अक्षयसमोर असलेली स्त्री नेमकी रमाच आहे की आणखी कोणी, हे पाहण्यासाठी अक्षयने तिची एक परीक्षा घेण्याचे ठरवले आहे.

मावशीला आई समजून…

मुरांबा या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, अक्षय रमासह तिच्या माहेरी गेला आहे. अक्षय माहीला म्हणतो की, तुझी आई तुला पाहून खूप खूश होणार आहे. रमा पुढे गेल्यावर अक्षय मनातल्या मनात म्हणतो, “आता कळेल ही रमा आहे की दुसरीच कोणी?” माही पुढे जाऊन स्वत:शी म्हणते, यातलं नेमकं घर कोणतं आहे? तिथली एक पाटी पाहून माही तेथील एका घराच्या दारावर थाप मारते. रमाची मावशी दरवाजा उघडते. तिला रमा, असे म्हणून ती मिठी मारते. तर माही मावशी आई, असे म्हणत तिला मिठी मारते. अक्षय हे सर्व पाहत असतो. तो रमाला म्हणतो, “रमा ही मावशी आहे. मावशीला आई समजून मिठी मारलीस.” अक्षयचे हे बोलणे ऐकल्यानंतर माही घाबरल्याचे तिच्या चेहऱ्यावर दिसत आहे. हा प्रोमो शेअर करताना “अक्षयचा संशय आणखी गडद होणार”, अशी कॅप्शन दिली आहे.

आता अक्षय ती रमा नसल्याचे ओळखू शकणार का, मालिकेत पुढे काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Muramba promo mahi will not recognize ramas mother will akshay find out her truth watch nsp