मालिकेतील कलाकार विविध निमित्ताने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसतात. सोशल मीडियावर त्यांचे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात. अनेकदा ट्रेडिंग गाण्यावर कलाकार डान्स करताना दिसतात. आता मात्र दोन लोकप्रिय अभिनेत्रीने महाराष्ट्राचा पारंपारिक फुगडी खेळल्याचा व्हिडीओ सध्या प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. लक्ष्मी निवास(Lakshami Niwas) व पारू(Paaru) या मालिकांचा महासंगम आहे. या दोन्ही मालिका एकत्र दिसणार आहेत. या निमित्ताने दोन्ही मालिकेतील कलाकार एकत्र आले आहेत. लक्ष्मी निवास व पारू मधील दोन अभिनेत्रींचा हा व्हिडीओला प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अहिल्यादेवी व लक्ष्मीने खेळली फुगडी

झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ढोल-ताशाचा आवाज ऐकायला मिळत आहे. या तालाच्या गजरात अहिल्यादेवी व लक्ष्मी यांनी फुगडी खेळल्याचे पाहायला मिळत आहे. त्यानंतर त्यांनी त्यावर ठेकाही धरला आहे. झी मराठीने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये अभिनेत्री मुग्धा कर्णिक यांना टॅग केले आहे. पारू मालिकेत मुग्धा कर्णिक यांनी अहिल्यादेवी किर्लोस्कर ही भूमिका साकारली आहे. लक्ष्मी निवास मध्ये लक्ष्मी ही भूमिका अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांनी साकारली आहे. पारू मालिकेची लोकप्रियता मोठी असल्याचे वेळोवेळी पाहायला मिळते. तर काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या लक्ष्मी निवास या मालिकेनेही प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे.

नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोत जयंत व अहिल्यादेवी समोरासमोर आल्याचे पाहायला मिळाले होते. पॅलेसवरून त्यांच्यात वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले होते. लक्ष्मी निवास’ या मालिकेत काही दिवसांपूर्वीच जान्हवी व जयंतचे लग्न ठरले आहे. त्यांच्या लग्नामुळे जान्हवीच्या घरातील सर्व जण आनंदात असल्याचे दिसत आहे. श्रीकांत व लक्ष्मी यांना जयंत हा जान्हवीसाठी योग्य वाटत असल्यामुळे तेदेखील आनंदात आहेत. दुसरीकडे पारू या मालिकेत अहिल्यादेवीने अनुष्का व आदित्यचे लग्न ठरवले आहे. अहिल्यादेवीसाठी आदित्यने अनुष्काबरोबर साखरपुडा करण्यास होकार दिला आहे.

दरम्यान, आता हे दोन कलाकार एकत्र आल्यानंतर महाएपिसोडमध्ये काय धमाल पाहायला मिळणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Paaru fame mugdha karnik and lakshmi niwas fame harshada khanvilkars fugdi watch video nsp