अभिनेता सुव्रत जोशी मराठीतील प्रसिद्ध अभिनेता आहे. मालिका, चित्रपट नाटक या माध्यामातून त्याने प्रेक्षकांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मराठीबरोबर त्याने आता हिंदीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. २०१९ मध्ये सुव्रतने अभिनेत्री सखी गोखलेशी लग्नगाठ बांधली. सखी प्रसिद्ध दिवंगत अभिनेते मोहन गोखले आणि अभिनेत्री शुभांगी गोखले यांची कन्या आहे. नुकत्याच एका मुलाखतीत सुव्रतने सासरे मोहन गोखले यांच्याबद्दल भाष्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- “देवाने स्वर्गातून पृथ्वीवर…” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम समीर चौघुलेंनी सोनाली कुलकर्णींचे का मानले आभार?

सुव्रत मोहन गोखले यांचा मोठा चाहता आहे. आणि त्यामुळेच त्याने सखीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. एका मुलाखतीत त्याला विचारण्यात आलं होतं की तुला मोहन गोखले यांचा जावई असल्याचा जास्त अभिमान आहे की सखी गोखलेचा नवरा असल्याचा जास्त अभिमान आहे. यावर उत्तर देताना सुव्रत म्हणाला. ” माझे सासर दिवंगत मोहन गोखले भारतातील सर्वोत्कृष्ट कलाकारांपैकी एक आहेत. मी सखीला नेहमी म्हणतो. जर ते हयात असते तर मला अभिमानापेक्षा प्रोत्साहन जास्त मिळालं असतं. कारण त्यांचा दर्जा खूप उच्च आहे. मी सखीच्या प्रेमात पडलो कारण ती टॅलेंटेड आहे. ती सुंदर आहे कर्तृत्वान आहे. मला गोखले कुटुंबाचा जावई बनल्यानंतर एक स्फुरण मिळतं. “

‘मिस्टर योगी’ मालिकेपासून घराघरांत पोहोचलेल्या मोहन गोखलेंनी ‘हिरो हिरालाल’,’ मोहन जोशी हाजीर हो’ यांसारख्या अनेक सिनेमांत अजरामर भूमिका केल्या. मात्र, २९ एप्रिल १९९९ रोजी वयाच्या अवघ्या ४५व्या वर्षी त्यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. यावेळी ते चेन्नईत ‘हे राम’च्या चित्रीकरणासाठी गेले होते.

हेही वाचा- “मी असेच राहणार, मला…”; लिव्ह इनमध्ये राहताना सखी-सुव्रतमध्ये झालं होतं भांडणं, अभिनेत्याने सांगितला किस्सा

सुव्रतच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेमधून तो पहिल्यांदा प्रेक्षकांच्या भेटीला आला या मालिकेत सखी आणि सुव्रतने पहिल्यांदा एकत्र काम केलं. त्यानंतर दोघे ‘अमर फोटो स्टुडिओ’ या नाटकात एकत्र दिसले होते. नुकतीच सुव्रतची ‘ताली’ ही हिंदी वेबसिरीज प्रदर्शित झाली. या वेबसिरीजमध्ये अभिनेत्री सुष्मिता सेनची मुख्य भूमिका आहे. यामध्ये सुव्रतने तृतीयपंथीची भूमिका साकारली आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suvrat joshi talk about his late father in law mohan gokhale dpj