‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. परंतु, सध्या ही मालिका एका वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आली आहे. मध्यंतरी या मालिकेत बबिताची भूमिका साकारणारी मुनमुन दत्ता आणि टप्पू म्हणजेच राज अनादकट यांच्या डेटिंगच्या चर्चा रंगल्या होत्या. परंतु, नुकत्याच न्यूज 18 ने दिलेल्या माहितीनुसार या दोघांनी गुपचूप साखरपुडा उरकल्याचं समोर आलं आहे.
जेठालालचा ऑनस्क्रीन मुलगा टप्पू म्हणजेच राज अनादकट आणि मुनमुन दत्ता यांनी जवळच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत गुजरात येथील वडोदरामध्ये काही दिवसांआधी गुपचूप साखरपुडा उरकल्याचा दावा न्यूज १८ च्या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.
हेही वाचा : उषा मंगेशकरांना ‘झी मराठी’चा ‘जीवन गौरव’, तर ‘मराठी पाऊल पडते पुढे’ पुरस्कारावर ‘या’ अभिनेत्रीने कोरलं नाव
मुनमुन आणि राज यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या रिलेशनशिपला परवानगी दिल्याने या दोघांनी एका नव्या आयुष्याची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. या दोघांनी अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तसेच साखरपुड्याचे फोटो देखील यांनी सोशल मीडियावर शेअर केलेले नाहीत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज अनादकट ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेचा भाग २०१७ मध्ये झाला. त्यामुळे सेटवरच्या प्रत्येकाला त्यांच्या रिलेशनशिपबाबत कल्पना होती. परंतु, या दोघांनी वैयक्तिक आयुष्याबाबत कुठेही भाष्य केलेलं नाही. सप्टेंबर २०२१ मध्ये मुनमुन आणि राज एकमेकांना डेट करत असल्याची पहिल्यांदा चर्चा रंगली होती.
मुनमुन सध्या ३६ वर्षांची असून राज हा २७ वर्षांचा आहे. या दोघांच्या वयात तब्बल ९ वर्षांचं अंतर आहे. दरम्यान, २०१७ मध्ये अभिनेता भव्या गांधीच्या जागी या शोमध्ये राज अनादकटची वर्णी लागली होती. तर मुनमुन सुरुवातीपासून या मालिकेचा एक भाग आहे.