‘झी मराठी’ वाहिनीवर प्रदर्शित होणाऱ्या झी चित्र गौरव पुरस्कारा(Zee Chitra Gaurav Puraskar)ची मोठी चर्चा सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. लवकरच हा पुरस्कार सोहळा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र, सध्या या कार्यक्रमाची झलक सोशल मीडयावर प्रदर्शित केलेल्या व्हिडीओंमधून पाहायला मिळत आहे. या कार्यक्रमातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. या सगळ्यात श्रेया बुगडे, गौरव मोरे, ओंकार भोजनेच्या एका व्हिडीओने लक्ष वेधून घेतले आहे. श्रेयाने घेतलेला उखाणादेखील लक्षवेधी ठरत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये गौरव मोरे, ओंकार भोजने व श्रेया बुगडे परफॉर्मन्स करताना दिसत आहेत. गौरव मोरे ‘पुष्पा’ या गाजलेल्या चित्रपटातील पुष्पा या भूमिकेत दिसत असून श्रेया श्रीवल्लीच्या भूमिकेत दिसत आहे. यामध्ये ओंकार भोजनेदेखील दिसत आहेत. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे की श्रीवल्ली पुष्पाला म्हणते सामी तू खूप कमाल बॉलर आहेस सामी. त्यावर तो गोंधळलेला दिसत आहे. तो प्रश्न विचारत म्हणतो मी बॉलर आहे? पोलीस असलेला ओंकार सांगतो वहिनी तो श्यामी, हा सामी. म्हणजे तुमचा नवरा आहे. नवरा म्हणजे एकदम फायर आहे. याच व्हिडीओमध्ये पुढे पाहायला मिळत आहे की श्रीवल्लीच्या भूमिकेतील श्रेया उखाणा घेते. ती म्हणते, “पुष्पारावांचं नाव घेते, जरा फायरला आवर घाला, दिवस गेलेत म्हणून झुकूंगी नहीं साला”, हा उखाणा ऐकल्यानंतर समोर बसलेल्या कलाकार खळखळून हसताना दिसत आहे.

आणखी एका व्हिडीओमध्ये गौरव अभिनेता श्रेयस तळपदेला पुष्पाचा आवाजात बोलून दाखवायला सांगत असल्याचे पाहायला मिळते. श्रेयसने पुष्पाचा आवाजात बोलून दाखवल्याचे पाहायला मिळत आहे. अभिनेत्याने पुष्पा चित्रपटातील पुष्पा या पात्राला आवाज दिला आहे. हे व्हिडीओ ‘मराठी आपला कट्टा’ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आले आहेत. हे व्हिडीओ शेअर करताना झी मराठी वाहिनीच्या इन्स्टाग्राम पेजला टॅग करण्यात आले आहे.

दरम्यान, श्रेया बुगडे, ओंकार भोजने, गौरव मोरे हे कलाकार त्यांच्या विनोदासाठी ओळखले जातात. श्रेया बुगडेने ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातून प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे. विविध भूमिका तिने या कार्यक्रमात साकारून प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे. ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमानंतर ती ‘ड्रामा ज्युनिअर’ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना दिसली होती. ओंकार भोजने व गौरव मोरे हे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून घराघरांत पोहोचले आहेत. ओंकार भोजने व गौरव मोरे काही चित्रपटातदेखील महत्वाच्या भूमिकेत दिसले आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zee chitra gaurav puraskar 2025 onkar bhojane gaurav more shreya bugde comedy performace shrivalli will take a special ukhana for pushpa nsp