अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर यांच्या ‘टॉयलेट एक प्रेमकथा’ सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. अगदी थोड्याच वेळ्यात या सिनेमाला लाखो लाइक्सही मिळाले. आगळी वेगळी कथा असलेला या सिनेमाचा ट्रेलर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पाहिला. त्यांनाही हा ट्रेलर तितकाच आवडल्याचं दिसतंय. मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानावर आधारित या सिनेमाची कथा असल्यामुळे सर्वसामान्यांना या सिनेमातून खूप काही शिकता येण्यासारखं आहे असा विश्वास सध्या अनेकांना वाटतो आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Father’s Day 2017: माझा बाबा बेस्ट फ्रेंड- केतकी माटेगावकर

नरेंद्र मोदी यांनी या ट्रेलरची प्रशंसा करताना ट्विट करत म्हटले की, ‘स्वच्छतेचा संदेश देण्याचा हा एक चांगला प्रयत्न आहे. स्वच्छ भारतासाठी १२५ कोटी जनतेने हाच संदेश पुढे नेला पाहिजे.’ अक्षय कुमारने मोदींचे हे ट्विट रिट्विट करत म्हटले की, ‘खूप आभार सर, लोकांची मानसिकता यामुळे बदलेल आणि नवीन बदल होईल ही आशा आहे.’

भूमी पेडणेकरनेही नरेंद्र मोदी यांना आपल्या ट्विटमध्ये टॅग करत म्हटले की, ‘या अभियानाचा एक भाग असणं आमच्यासाठी फार गौरवास्पद आहे. तुमच्या पाठिंब्यासाठी खूप आभारी आहोत.’ भूमीचीही फार महत्त्वपूर्ण भूमिका या सिनेमात आहे.

‘टॉयलेट एक प्रेमकथा’ हा भूमीचा दुसरा सिनेमा आहे. याआधी राष्ट्रीय पुरस्कार विजेता ‘दम लगा के हैशा’ या सिनेमात तिने काम केले होते. तर दुसरीकडे या वर्षातला अक्षयचा हा दुसरा सिनेमा आहे. अक्षयने त्याच्या सिनेमांमधून प्रेक्षकांना नेहमीच अंतर्मुख केले आहे. या सिनेमात गावकऱ्यांच्या दैनंदिन आयुष्यातल्या समस्यांवर भाष्य करण्यात आले आहे.

PHOTOS : जेव्हा बिग बी भाड्याच्या घरात राहायचे….

‘द जॉली एलएलबी २’ अभिनेता ‘टॉयलेट एक प्रेमकथा’नंतर, सॅनिटरी नॅपकीनवरही भाष्य करणार आहे. सध्या टॉयलेट एक प्रेमकथाचं प्रमोशन करत असतानाच तो ‘पॅडमॅन’ या सिनेमाच्या चित्रीकरणामध्येही व्यस्त आहे. ‘पॅडमॅन’मध्ये अक्षयसोबत सोनम कपूर आणि राधिका आपटेही दिसणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Toilet ek prem katha prime minister narendra modi hails akshay kumar and bhumi pednekar calls it a good effort