मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीत भूमिका आणि चित्रपटांच्या बाबतीत चोखंदळ राहून रंगभूमी, चित्रपट आणि दूरचित्रवाहिनी या तिन्ही माध्यमांवर सातत्याने वैविध्यपूर्ण काम करत राहणे अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या कलाकारांना जमले आहे. ऐंशीच्या दशकात समांतर चित्रपटांचा जो प्रवाह मूळ धरू लागला होता, त्याचा पुरेपूर उपयोग करत अभिनय आणि दिग्दर्शन दोन्ही क्षेत्रात नावलौकिक कमावलेल्या पंकज कपूर या प्रतिभावंत कलाकाराशी संवाद साधण्याचा योग ‘लोकसत्ता गप्पा’च्या नव्या पर्वात जुळून आला आहे.

विविध क्षेत्रांतील प्रतिभावंतांशी संवाद साधत त्यांचे विचार, अनुभव जाणून घेण्याची संधी ‘लोकसत्ता गप्पा’ या खास उपक्रमातून मिळते.

रंगभूमीवर वैविध्यपूर्ण नाटकांतून भूमिका करत अनुभवाची शिदोरी गोळा केलेल्या पंकज कपूर यांना पहिल्यांदा रिचर्ड अटेनबरो यांच्या ‘गांधी’ चित्रपटात भूमिका मिळाली. त्याच वर्षी म्हणजे १९८२ मध्ये त्यांनी श्याम बेनेगल यांच्या ‘आरोहण’ चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर त्यांची कारकीर्द आणखी बहरत गेली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रायोजक

● सहप्रायोजक : केसरी टूर्स आणि ठाणे भारत सहकारी बँक लिमिटेड

● पॉवर्ड बाय : एम के घारे ज्वेलर्स

‘लोकसत्ता गप्पा’चे नवे पर्व १ मार्चला