मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत विविध समाजघटकांना एकत्र करून निवडणूक जिंकण्याचे प्रारूप महाराष्ट्रातही राबविण्याचा पक्षाने प्रयत्न सुरू केला आहे. त्याची सुरुवात अल्पसंख्याक पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यापासून करण्यात आली. आगामी निवडणुकीत काँग्रेसला साथ द्यावी, अशी साद पक्षाच्या नेत्यांनी अल्पसंख्याक समाजाला घातली आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसला मिळलेल्या यशामुळे महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षात उत्साह संचारला आहे. काँग्रेसला विजयाकडे घेऊन जाणारे हे प्रारूप महाराष्ट्रातही राबविण्याचे पक्षाने ठरविले आहे. दादर येथील टिळक भवनात बुधवारी काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात प्रामुख्याने कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील विजयाची व अल्पसंख्याक समाजाने पक्षाला दिलेली साथ याची चर्चा करण्यात आली.
First published on: 25-05-2023 at 03:06 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress attempt to implement the karnataka model in maharashtra ysh