मुंबई : हरवलेल्या मुलाच्या तपासाबाबत माहिती विचारण्यासाठी गेलेल्या तक्रारदाराला मारहाण केल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकाविरोधात माहीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गहिनीनाथ सातव असे आरोपी पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

फिर्यादी गणेश तुकाराम जळगावकर (५५) हे नदिम शेख आणि त्याचा भाऊ यांच्याबरोबर गुरुवारी दुपारच्या सुमारास माहीम पोलीस ठाण्यात गेले होते. या वेळी गणेश यांनी पोलीस ठाण्यात नोंदविलेल्या तक्रारीतील हरविलेल्या मुलाचा शोध कोणत्या ठिकाणी घेतला, अशी विचारणा पोलीस अधिकारी सातव यांना केली. याचा राग आल्याने सातव यांनी गणेश यांना मारहाण केली. सातव यांच्या मारहाणीमुळे ते टेबलावर कोसळले. त्यांच्या डोक्याला दुखापत झाल्याचे पोलिसांनी सांगितले. तर जळगावकर यांच्याविरोधातही आत्महत्येचा प्रयत्न करणे, लोकसेवकाला कामापासून परावृत्त करणे, धमकी देणे या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crime against police officer for assaulting complainant zws