मनसेची खेळी यशस्वी..
मराठी-गुजराती समाजात तेढ निर्माण करणाऱ्या बसवरील जाहिरातींविरोधात मनसेने बेस्ट समितीत आवाज उठवताच बेस्ट उपक्रमाने बसवरील जाहिराती शनिवारी उतरवल्या. गुजराती मुद्दय़ावरून एकीकडे मराठी कार्ड वापरतानाच सेनेला कोंडीत पकडण्याची मनसेची दुहेरी खेळी यावेळी यशस्वी ठरली आहे.
मुंबईच्या आर्थिक व बौद्धिक विकासाचे श्रेय फक्त गुजराती समाजाला देणाऱ्या जाहिराती बेस्ट उपक्रमातील ११५ बसवर लावण्यात आल्या होत्या. याबाबत मनसेकडून शुक्रवारी बेस्ट समितीत आवाज उठवण्यात आला. मात्र बेस्ट समितीची सत्ता हाती असलेल्या शिवसेनेला याबाबत कोणतीही भूमिका मांडता आली नाही. गुजराती समाजाला ‘सामना’तील अग्रलेखातून ज्ञानामृत पाजण्याचा प्रयोग अंगलट आल्याने, नेमकी कोणती बाजू उचलावी याबाबत सेना सदस्य संभ्रमात होते. या संभ्रमाचा फायदा उचलत मनसेने पुन्हा एकदा मराठीचा मुद्दा लावून धरला. मनसेने उपस्थित केलेल्या मुद्दय़ात सत्य असले तरी तथ्य नसल्याचे बेस्ट समितीचे अध्यक्ष सांगत होते. बेस्टने जाहिराती उतरवल्या नाहीत तर मनसे त्यांच्या स्टाइलने जाहिराती उतरवेल ही मनसेने दिलेली मात्रा मात्र लागू पडली आणि याबाबत आंदोलन करून मनसेला अधिक श्रेय मिळू नये यासाठी बेस्ट बसवरील जाहिराती उतरविण्यास सुरुवात झाली.
बेस्टवरील जाहिरातींबाबत योग्य ती कारवाई केली जाईल, असे बेस्टचे महाव्यवस्थापक ओ. पी. गुप्ता यांनी आश्वासन दिले होते. त्यानुसार शनिवार सकाळपासून या जाहिराती काढण्यास सुरुवात झाली, अशी माहिती बेस्टचे जनसंपर्क अधिकारी ए. एस. तांबोळी यांनी दिले. दरम्यान संबंधित जाहिराती देणाऱ्या वृत्तपत्रानेही सर्व ठिकाणावरील जाहिराती मागे घेण्याचे पाऊल उचलल्याचे समजते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

railway mega block
railway mega block, mumbai news
railway mega block, mumbai news, loksatta
आज मेगाब्लॉक
’कुठे- भायखळा ते विद्याविहार डाऊन धिम्या मार्गावर
’कधी- रविवार ११ मे, सकाळी ११.२० ते दुपारी ३.२०
’परिणाम- सकाळी ११.०४ ते दुपारी ३.२१ या वेळेत भायखळा ते विद्याविहार रेल्वे स्थानकादरम्यान डाऊन धिम्या गाडय़ा डाऊन जलद मार्गावरून चालविण्यात येणार. त्यामुळे परळ, दादर, माटुंगा, शीव, कुर्ला या रेल्वेस्थानकांवर त्या थांबतील आणि पुढे पुन्हा डाऊन धिम्या मार्गावर वळविण्यात येतील. अप जलद मार्गावरील गाडय़ा सकाळी ११.२१ ते दुपारी ३.२५ या वेळेत ठाणे, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला येथे थांबतील. या मेगाब्लॉकमुळे उपनगरी गाडय़ांची वाहतूक १५ ते २० मिनिटे उशिराने होणार आहे.

’कुठे- जिते ते पेण रेल्वे स्थानका दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर
’कधी- ११ ते १३ मे. दुपारी १ ते ४  
’परिणाम- पेण रेल्वे स्थानकाच्या यार्ड रिमॉडेलिंगसाठीच्या या ब्लॉकमुळे ७१०८९ ही दिवा येथून सकाळी ९.१० वाजता सुटणारी गाडी हे तीन दिवस दिवा ते आपटा अशी चालविण्यात येईल तर ७१०९६ ही रोहा येथून दुपारी ३.४० वाजता दिवा येथे सुटणारी गाडी आपटा ते दिवा अशी चालविण्यात येणार आहे. आपटा येथून ही गाडी संध्याकाळी ५.३१ वाजता सुटणार आहे. या मार्गावर धावणाऱ्या लांब पल्ल्यांच्या गाडय़ा नियोजित वेळापत्रकापेक्षा दीड ते अडीच तास उशिराने धावतील.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Finally gujarati ads removed