नवाब मलिक यांच्याविरोधात ‘अ‍ॅट्रॉसिटी’चा गुन्हा ; वानखेडे यांची तक्रार 

जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून वानखेडे यांना नुकताच दिलासा मिळाला आहे.

नवाब मलिक यांच्याविरोधात ‘अ‍ॅट्रॉसिटी’चा गुन्हा ; वानखेडे यांची तक्रार 
(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : अमलीपदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) मुंबईचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या तक्रारीवरून माजी मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात गोरेगाव पोलीस ठाण्यात अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी वानखेडे यांचा जबाब नोंदवण्यात आला होता.

जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून वानखेडे यांना नुकताच दिलासा मिळाला आहे. याप्रकरणी आता बदनामी करणे व अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा करण्यात आला आहे.  याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकारी करणार आहे.

मलिक यांनी वानखेडे यांच्यावर आरोप करताना वानखेडे कुटुंबीयांबद्दल काही आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला होता, असा आरोप करण्यात आला आहे.  वानखेडे यांची वर्षभरात नोकरी जाणार, त्यांना तुरुंगात टाकणार अशा शब्दांचाही वापर करण्यात आला होता.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला जल्लोष
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी