मुंबई : मुंबई महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या सागरी किनारा मार्गावरून रोज धावणाऱ्या वाहनांची संख्या ऑगस्ट महिन्यापासून कमी होत आहे. संपूर्ण प्रकल्पाचे अद्याप लोकार्पण झालेले नसले तरी जे भाग खुले आहेत त्यावरील वाहतूक गेल्या तीन महिन्यांत घटल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले. मात्र, पालिका अधिकाऱ्यांनी हा निष्कर्ष फेटाळून लावला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : ठाणे, मुंबई शहरचे पालकत्व शिंदेंकडे

मरिन ड्राइव्ह येथील प्रिन्सेस स्ट्रीट ते वांद्रे वरळी सागरी सेतूच्या दक्षिण टोकापर्यंत सागरी किनारा मार्ग आहे. तब्बल १४ हजार कोटींच्या या प्रकल्पांतर्गत मार्गाची लांबी १०.५८ किमी आहे. या प्रकल्पामुळे दक्षिण मुंबई व उत्तर मुंबई जोडले जाऊन दळणवळण सुलभ होईल असा पालिका प्रशासनाचा विश्वास आहे. प्रकल्पाचे ९५ टक्के काम पूर्ण झाले असून त्याचे गेल्या वर्षभरात टप्प्याटप्प्याने लोकार्पण करण्यात आले. संपूर्ण मार्ग लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र, आतापर्यंत वाहतुकीसाठी खुल्या झालेल्या मार्गावरून धावणाऱ्या वाहनांची संख्या ऑगस्ट महिन्यापासून कमी झाल्याचे आढळले आहे.

दरम्यान, सागरी किनारा प्रकल्पाशी संबंधित अधिकाऱ्यांनी याबाबत सांगितले की, ऑगस्टनंतर दिवाळी आणि नाताळच्या सुट्ट्यांमुळे वाहनांची संख्या रोडावल्याची शक्यता आहे. तसेच काही दिवस सीसीटीव्ही कॅमेरा बंद असल्यामुळेही वाहनांची संख्या पूर्णत: उपलब्ध झाली नसावी, असेही मत त्यांनी व्यक्त केले. तर, सांख्यिकी माहिती हा गुंतागुंतीचा विषय असून त्यावरून असा निष्कर्ष काढता येणार नाही. सागरी किनारा मार्गावरील वाहतूक घटली असे होऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अमित सैनी यांनी दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In mumbai number of vehicles decreased on the coastal road css