मुंबई: Old Pension Scheme Employee Scheme राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्तिवेतन योजना लागू करावी, यासाठी विरोधी पक्षांच्या आमदारांनी विधान परिषदेचे कामकाज रोखून धरल्यामुळे दोनदा सभागृह तहकूब करावे लागले. यावरही समाधान न झाल्यामुळे विरोधी पक्षाच्या आमदारांनी मंगळवारी दिवसभराच्या कामकाजावर बहिष्कार घातला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जुनी योजना लागू करण्यासाठी राज्यातील कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून (ता.१४) बेमुदत संप पुकारला आहे. राज्यभरातील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी संपाला प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे सरकारने संवेदना दाखवत या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री अथवा उपमुख्यमंत्री यापैकी कोणीही सभागृहात येऊन निवेदन करावे, अशी मागणी विरोधी पक्षांच्या आमदारांनी केली. यावेळी दानवे म्हणाले, राज्यात या संपात १८ लाख कर्मचारी सहभागी झाले आहेत. सरकार दखल घेत नाहीत म्हणून हे कर्मचारी संपावर जात आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Opposition boycotts legislative council proceedings over old pension scheme ysh