दहशतवादी हल्ल्याबाबत सुरू असलेल्या बातम्या पाहत असताना जुहूमधील इस्कॉन मंदिर येथे राहणाऱ्या सर्वेश कुमार यांना एका दूरध्वनी आला आणि त्यावर अनोळखी व्यक्ती संशीयत चर्चा करीत होती. याप्रकरणी पोलिसांनी आठ तास चौकशी केल्यानंतर त्यांना डोक्यावर हात मारण्याची वेळ आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>मुंबई : डाळी, कडधान्ये शंभरीपार; होळीपर्यंत जैसे थे परिस्थिती

सर्वेश कुमार यांना अनोळखी व्यक्तीने दूरध्वनी करून ‘सब तयार हैं ना, मैं १७ तारीख को आ रहा हु, युसूफ को मिल लिया? शक हो गया’, असे बोलून दूरध्वनी बंद करण्यात आला. समोर मुंबईवर हल्ल्याबाबततच्या बातम्या पाहत असल्यामुळे त्यांना संशय आला व त्यांनी तात्काळ मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाशी दूरध्वनीवरून संपर्क साधून घडलेल्या प्रकाराची माहित दिली. पोलिसांनीही तात्काळ तपासाला सुरुवात केली. आठ तास चौकशी केल्यानंतर तो दूरध्वनी चुकून लागल्याचे निष्पन्न झाले. दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीला भोपाळमध्ये दूरध्वनी करायचा होता. मात्र तो दूरध्वनी चुकून सर्वेश कुमार यांना लागला. चुकीचा दूरध्वनी लागल्याचे समजताच समोरच्या व्यक्तीने दूरध्वनी ठेवला. पण या संपूर्ण संशयास्पद वागण्यामुळे सर्वेश कुमार यांचा गैरसमज झाला. या चुकीचा फोन आणि गैर समजामुळे पोलीस यंत्रणा मात्र कामाला लागली.

हेही वाचा >>>“या लोकांनी महाराष्ट्राचा बिहार केला”, पत्रकाराच्या हत्येनंतर जयंत पाटील यांची सरकारवर सडकून टीका

विमातळावर धमकीचा दूरध्वनी आल्याची बातमी मंगळवारी दिवसभर प्रसिद्ध माध्यमांवर दाखवण्यात आली. विमातळावरील संपर्क कार्यालयातील दूरध्वनीवर इरफान अहमद शेख नावाच्या व्यक्तीने सोमवारी दूरध्वनी केला होता. त्याने दहशवादी, मुजाहिद्दीन आणि अन्य काही संशयास्पद वक्तव्ये केली होती. त्यामुळे विमानतळावरील यंत्रणा सतर्क झाली होती. तात्काळ विमानतळावर तपासणी करण्यात आली. मात्र तपासणी मोहिमेत कोणतीही संशयास्पद बाब आढळली नाही. दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सहार पोलिसानी अनोळखी व्यक्तीविरोधात कलम ५०५ (१) अंतर्गत गुन्हा दाखल केल्याचे सूत्रांनी सांगितले. याप्रकरणी २७ वर्षीय तरुणाला गोवंडीमधून ताब्यात घेण्यात आले आहे. वेब सिरीज पाहून त्याने इंडियन मुजाहिद्दीनचे नाव घेतले होते. हीच बातमी पाहत असताना सर्वेशकुमार यांना हा दूरध्वनी आल्याचे बोलले जाते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police system in confusion due to cross connection on mobile about terrorist attack mumbai print news amy