मुंबईतील देवनार येथील स्वामी समर्थांच्या मठाच्या छप्पराचे पत्रे उचकटून दानपेटीतील रक्कम चोरल्याचा प्रकार घडकीस आला आहे. याप्रकरणी देवनार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- सणासुदीच्या तोंडावर सर्वसामान्यांना महागाईची झळ, सीएनजी आणि पीएनजीच्या दरात मोठी वाढ

गोवंडीतील म्युनिसिपल कॉलनी येथील स्वामी समर्थांच्या मठात नुकताच हा प्रकार घडल्याची माहिती सूत्रांनी दिली. याप्रकरणी स्थानिक रहिवासी दर्शन खांडरे (३०) यांच्या तक्रारीवरून देवनार पोलिसांनी अज्ञान आरोपीविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला. मठामध्ये रविवारी मध्यरात्री चोरी झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. आरोपीने मठाच्या छप्पराचे पत्रे उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर दानपेटीतील टाळे तोडून त्यातील रक्कम आरोपीने चोरली.

हेही वाचा- भाजपची शुक्रवारपासून तीन दिवस चिंतन बैठक ; राज्यातील महत्त्वाच्या विषयांवर चर्चा

दानपेटीतील नोटा व नाणी मिळून १४ ते १५ हजार चोरल्याचा आरोपी तक्रारीत करण्यात आला आहे. याप्रकरणी तक्रार करण्यात आल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट घेऊन पाहणी केली. आरोपींनी पाळत ठेऊन हा प्रकार केल्याचा संशय आहे. परिसरातील सीसी टीव्ही कॅमेरातील चित्रणाची तपासणी करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांच्या हाती काही माहिती मिळाली असून त्याच्या आधारे तपास सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.राचे पत्रे उचकटून दानपेटीतील रक्कम लूटली

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Theft at swami samarth temple in deonar mumbai print news dpj