24 year old youth committed suicide on dussehra festival zws 70 | Loksatta

बुलढाणा : विजयादशमीलाच युवकाने संपविले जीवन

छोटेखानी मंदिर परिसरातील पळसाच्या झाडाला दोरीचा गळफास लावून आत्महत्या केली.

बुलढाणा : विजयादशमीलाच युवकाने संपविले जीवन
सुनील रतन वाणी आत्महत्या करणारा युवक

बुलढाणा : राजूर घाटातील खडकी मार्गावरील देवीच्या चबुतऱ्याजवळ २४ वर्षीय युवकाने दसऱ्याच्या दिवशी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली.

सुनील रतन वाणी (२४), राहणार शांतीनगर, बुलढाणा) असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. अपंग असणारा सुनील ५ ऑक्टोबर रोजी सकाळीच त्यायत टीव्हीएस स्कुटी (एमएच २८ एव्ही ४९८०) घेऊन घरातून बाहेर पडला होता, असे पोलीस तपासात निष्पन्न झाले. त्याने मलकापूर मार्गावरील राजूर घाटातील निर्मनुष्य असलेला खडकी परिसर गाठला. यानंतर छोटेखानी मंदिर परिसरातील पळसाच्या झाडाला दोरीचा गळफास लावून आत्महत्या केली. त्याची दुचाकी देखील त्याच परिसरात आढळून आली. घटनेची माहिती मिळताच बुलढाणा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार, नायक पोलीस गंगेश्वर पिंपळे, विनोद बोरे, चालक वाघ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवला.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
यवतमाळ :‘रावणाचे दहन करायचे असल्यास आम्हाला सुद्धा जाळा ; रावण दहनाविरोधात आदिवासींचे ‘चिपको’ आंदोलन,

संबंधित बातम्या

नागपूर : वकील होण्याचे होते युवकाचे स्वप्न, पालकांच्या आग्रहामुळे अभियांत्रिकीला घेतला प्रवेश; नैराश्यातून उचलले टोकाचे पाऊल
“हे फक्त गडकरीच करू शकतात, तो काँग्रेसचा नेता असूनही…”, नाना पाटेकरांचं नागपुरात वक्तव्य
अमरावती: पोलीस भरतीचे स्वप्न अधुरे; सरावादरम्यान तरुणीचा अपघाती मृत्यू
पंतप्रधानांचा नागपूर दौरा, विद्यापीठ निवडणूक पुढे ढकलणार?
राज्यात मजबूत विरोधी पक्षाची गरज; सुषमा अंधारेंचे वक्तव्य

व्हिडिओ

ताज्या बातम्या
शेतकऱ्यांच्या मुलांना ड्रोन चालवण्याचं प्रशिक्षण दिलं जाणार; खरेदीसाठी सबसिडीही मिळणार – कृषीमंत्री अब्दुल सत्तार
“आता लवकरच…” लग्नानंतरची पाठकबाईंची ‘ती’ पोस्ट चर्चेत
सॅलेडमध्ये मीठ टाकण्याची सवय आहे का? यामुळे होऊ शकते आरोग्याचे नुकसान, लगेच जाणून घ्या
‘बाळासाहेबांची शिवसेने’चे उद्या पुण्यात शक्तीप्रदर्शन; खासदार श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीत अन्य पक्षांतील कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश
ऐकावं ते नवलचं! १ कोटीचं पॅकेज तरिही ऑफिसमध्ये नाही काम, कर्मचाऱ्याने चक्क बॉसविरोधात कोर्टात दिली तक्रार