चंद्रपुरातील ताडोबा – अंधारी व्याघ्र प्रकल्पातील १७ वर्षीय वाघाडोह या वाघाचा सोमवारी सकाळी मृत्यू झाला. दोन दिवसांपूर्वी वाघाडोह वाघाच्या हल्ल्यात सिनाला येथे गुराख्याचा मृत्यु झाला होता. तेव्हापासून वाघाडोह वाघावर ताडोबाच्या अधिकाऱ्यांचे लक्ष होते. त्याची प्रकृती ठीक नव्हती. १७ वर्ष वय असल्याने तो म्हातारा झाला होता. अशातच आज सोमवारी सकाळी त्याचा नैसर्गिक मृत्यू झाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दोन दिवसांपूर्वी वाघाचे काही फोटो व्हायरल झाले होते. हा वाघ वयस्कर असल्याने वन्यप्राण्यांची शिकार करणे त्याला अवघड झाले होते.

हा वाघ चंद्रपुरातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सर्वात मोठा आणि वयस्कर होता. वयस्कर असल्याने त्याला शिकार करणं अशक्य होतं. तसंच त्याने सिनाळा गावालगत आपले बस्तान मांडलं होतं. या परिसरात गेल्या काही दिवसांपासून वाघडोह वाघाचा वावर होता. अतिशय म्हातारा आणि अशक्त असलेला वाघडोह माणसं आणि पाळीव जनावरांसाठी धोकादायक ठरू शकतो ही शक्यता लक्षात घेता वनविभाग वाघावर नजर ठेवून होता.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A tiger of tadoba waghdoh dies sgy