अकोला : खगोलप्रेमींना आकाश दिवाळीची पर्वणी मिळणार आहे. पूर्व क्षितिजावर चंद्र-शूक्र युतीची अपूर्व अनुभूती गुरुवारी घेता येईल, अशी माहिती विश्वभारती केंद्राचे प्रमुख प्रभाकर दोड यांनी दिली. दिवाळीच्या उत्सवात आकाशही सहभागी होणार असल्याने खगोलप्रेमींचा आनंद द्विगुणित होणार आहे. सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी आणि आपल्या पृथ्वीला सर्वात जवळ असलेला शूक्र ग्रह पहाटे पूर्व क्षितिजावर अत्यंत ठळक स्वरूपात दर्शन देत असून ९ नोव्हेंबर रोजी या ग्रहाची चंद्रासोबत युती घडुन येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : अकोल्यात मोक्षधामाचा विकासात्मक कायापालट; स्वखर्चातून सुविधांसह सौंदर्यीकरण

पहाटेच्या वेळी आपल्या भागात हे दोन्ही खगोल एकमेकांना अधिक जवळ युती स्वरूपात असतील, तर काही भागात पीधान युती होईल. काही कालावधीपर्यंत शूक्र ग्रह चंद्रबिंबाआड जाईल. यादिवशी शूक्र ग्रह उत्तर रात्री ३.१५ च्या सुमारास तर चंद्र ३.३० च्या सुमारास पूर्व क्षितिजावर उदय पावून सकाळी ९.१५ च्या सुमारास आकाश मध्याशी येतील. याच दिवशी दिवसा सुद्धा शूक्र दर्शन होऊ शकते. चंद्र व शूक्र ग्रह कन्या राशीत असून चंद्राची अकरावी तर शूक्र ग्रहाची नवमीची कला असेल. चंद्रकोर आणि शूक्र हे दोन्ही खगोल एकमेकांच्या अगदी जवळ असतांनाचे दृश्य सर्व आकाश प्रेमींनी पहाटे ४ ते ६ या वेळात अवश्य आपल्या डोळ्यात साठवावे, ते अप्रतिम स्वरूपात असेल, असे प्रभाकर दोड यांनी सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akola extraordinary sensation tomorrow of the moon venus conjunction on the eastern horizon ppd 88 css