नागपूर: ‘व्हेलेंटाईन डे’च्या दुसऱ्याच दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. २४ तासांतच सोन्याच्या दरात मोठी घट झाल्याने लग्नासह इतर समारंभानिमित्त सोने- चांदीचे दागिने खरेदीसाठी इच्छुक असलेल्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान सोन्याचे शनिवारी (१५ फेब्रुवारी २०२५) दर काय होते? याबाबत आपण जाणून घेऊ या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

केंद्रिय अर्थसंकल्पानंतर मागच्या वर्षी सोन्याच्या दरात मोठी घट झाली होती. केंद्र सरकारने सोन्यावरील सीमाशुल्क ६ टक्केपर्यंत कमी केल्याने या घसरणीचा क्रम बरेच दिवस कायम होता. परंतु यंदाच्या अर्थसंकल्पानंतर मात्र सोन्याचे दर सातत्याने वाढतांना दिसत आहे. सोन्याचे दर वाढत असल्याने ग्राहकांमध्ये चिंता आहे. दरम्यान व्हेलेंटाईन डेच्याही दिवशी सोन्याचे दर उच्चांकीवर असल्याने प्रेमी युगलासह आपल्या पत्नीला विविध दागिने भेट देण्यासाठी ग्राहकांना जास्त खिसा रिकामा करावा लागला.

व्हेलेंटाईन डेच्या दिवशी १४ फेब्रुवारी २०२५ रोजी नागपुरातील सराफा बाजारात सोन्याचे दर प्रति दहा ग्राम ८६ हजार ३०० रुपये, २२ कॅरेटसाठी ८० हजार ३०० रुपये, १८ कॅरेटसाठी ६७ हजार ३०० रुपये, १४ कॅरेटसाठी ५६ हजार १०० रुपये नोंदवले गेले. हे दर दुसऱ्याच दिवशी मोठ्या प्रमाणात घसरले. १५ फेब्रुवारी २०२५ रोजी नागपुरातील सराफा बाजारात सकाळी बाजार उघडल्यावर सोन्याचे दर प्रति दहा ग्राम २४ कॅरेटसाठी ८५ हजार १०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७९ हजार १०० रुपये, १८ कॅरेटसाठी ६६ हजार ४०० रुपये, १४ कॅरेटसाठी ५५ हजार ३०० रुपयापर्यंत खाली आले. त्यामुळे नागपुरातील सराफा बाजारात २४ तासातच २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति दहा ग्राम १ हजार २०० रुपये, २२ कॅरेटसाठी १ हजार २०० रुपये, १८ कॅरेटसाठी ९०० रुपये, १४ कॅरेटसाठी ८०० रुपयांनी खाली घसरलेले दिसत आहे. दरम्यान सध्या सोन्याच्या दरात घट असली तरी आंतराष्ट्रीय घडामोडी बघता सोन्याचे दर येत्या काळात आणखी वाढणार असल्याने सोने- चांदीमध्ये सध्या गुंतवणुकीची चांगली संधी असल्याचा सराफा व्यवसायिकांचा दावा आहे.

चांदीच्या दरात मोठी घसरण…

नागपुरातील सराफा बाजारात व्हेलेंटाईन डेच्या दिवशी शनिवारी (१४ फेब्रुवारी २०२५ रोजी) चांदीचे दर ९८ हजार ५०० रुपये प्रति किलो होते. हे दर दुसऱ्या दिवशी १५ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी सराफा बाजार उघडल्यावर ९६ हजार ५०० रुपये प्रति किलोपर्यंत खाली आले. त्यामुळे चांदीच्या दरात प्रति किलो तब्बल २ हजार रुपयांची घट झाली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gold prices fell on the second day of valentine day nagpur news mnb 82 amy