बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यात सोमवारी (ता. २७ २७) गारपीट व वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने हा अंदाज वर्तविला आहे. अंदाजानुसार जिल्ह्यात २७ नोव्हेंबर रोजी तुरळक ठिकाणी गारपीट व वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गतच्या जिल्हा कृषी हवामान केंद्राने ही माहिती दिली आहे. शेतकरी बंधूंनी कापणी केलेला शेतमाल, तोडणी केलेला भाजीपाला व फळे सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवण्याचा सल्लाही केंद्राने दिला आहे. याशिवाय जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधून ठेवावी, असेही सांगण्यात आले आहे.
First published on: 26-11-2023 at 16:41 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Imd weather forecast hailstorm and heavy rain are likely to occur in buldhana district scm 61 css