राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघातर्फे आज गुरुवारी बुलढाण्यासह राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. याअंतर्गत जिल्हा कचेरीवर मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली.आपल्या विविध मागण्यांसाठी संघटनेतर्फे १९ मार्चपासून विविध टप्प्यात राज्यव्यापी आंदोलन करण्यात येत आहे. कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन द्यावी, केंद्राचे कामगार विरोधी चार कायदे रद्द करावे, ३५० सरकारी कंपन्यांचे खाजगीकरण रद्द करावे, शैक्षणिक धोरण-२०२० रद्द करावे, अंशकालीन कर्मचाऱ्यांना नियमित करावे, अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांची फेलोशिप आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>चंद्रपूर: ‘वाचाल तर वाचाल’, नवरगाव येथे विदर्भातील पहिली वाचन संस्कृती कार्यशाळा

राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली आज राज्यातील ३६ जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे काढण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष सुनील जवंजाळ, यांनी यावेळी दिली. बुलढाण्यातील मोर्चानंतर निदर्शने करण्यात आली. यामध्ये कैलास गंधारे, राजू जाधव, सतीश मोहोड, आकाश मेहेत्रे, जी.डी. गवई यांच्यासह कर्मचारी सहभागी झाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rashtriya moolnivasi bahujan karmchari sangh march for old pension fellowship to students buldhana scm 61 amy