वर्धा : राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये क वर्गातील पदे भरण्यात येत आहेत. ३४ जिल्हा परिषदांमध्ये एकूण १९ हजार ४६० पदे भरल्या जात आहेत. इच्छुकांना २५ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज करायचा आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सर्व ठिकाणी एकाच कालावधीत पदनिहाय संगणीकृत परीक्षा होणार. म्हणून एकाच पदासाठी जास्त जिल्हा परिषदेत अर्ज करू नये. शुल्काचा नाहक खर्च होणार. प्रवेशपत्र हे संगणीकृत यंत्रणेमार्फत तयार होणार असल्याने उमेदवाराने एका संवर्गासाठी एकापेक्षा अधिक ठिकाणी अर्ज केले असल्यास व परीक्षा प्रवेशपत्रनुसार उमेदवारास एकाच वेळेस अन्य ठिकाणी परीक्षा क्रमांक आल्यावर त्या ठिकाणी परीक्षा देता न आल्यास त्यास जिल्हा परिषद जबाबदार राहणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे.

हेही वाचा – ‘आययुसीएन’च्या यादीतील संकटग्रस्त गिधाड उपचारासाठी नागपुरात!

हेही वाचा – वाशिम : रेल्वे स्टेशनचा कायापालट करा, परंतु भिवसन अंभोरे यांच्या स्मृति जपा! माजी सैनिकांची मागणी

म्हणून एकाच जिल्हा परिषदेसाठी अर्ज करणे आवश्यक आहे. तसेच दोन अर्ज भरले असल्यास दुसरा अर्ज ग्राह्य धरला जाणार आहे. परीक्षेच्या तारखेबाबत उमेदवारांनी सातत्याने जिल्हा परिषदेचे संकेतस्थळ पाहण्याची सूचना करण्यात आली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zp recruitment in maharashtra important information about it pmd 64 ssb