अभिनेते किशोर कदम यांचा चिमटा

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आपले नाशिक हे अत्यंत सुसंस्कृत शहर असून त्याचे पुणे शहर होऊ देऊ नका, असे प्रतिपादन कवी व अभिनेते किशोर कदम ऊर्फ सौमित्र यांनी केले. येथील फॅमिली फिजिशियन्स असोसिएशन या डॉक्टरांच्या संस्थेच्या कार्यकारिणीच्या पदग्रहण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून कदम उपस्थित होते.

या वेळी सौमित्र यांनी त्यांच्या अनेक कविता सादर केल्या. आपण फॅमिली डॉक्टर असलात तरी आपल्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्याही समर्थपणे पेलल्या पाहिजेत, अशी सूचनाही त्यांनी केली. या वेळी संघटनेच्या अध्यक्ष म्हणून डॉ. प्रणिता गुजराथी, सचिव डॉ. स्मिता कांबळे, खजिनदार डॉ. प्रमोद आहेर यांनी पदभार स्वीकारला. उपाध्यक्षपदी आशालता देवळीकर, सहसचिव डॉ. आशुतोष भट, तसेच सुसंवाद या मासिकाचे संपादक म्हणून डॉ. सुनील औंधकर, सहसंपादक म्हणून डॉ. प्रतिभा जोशी यांची नेमणूक झाली. या वेळी नाटय़ लेखक दत्ता पाटील हेही उपस्थित होते.

याप्रसंगी डॉ. गुजराथी यांनी छोटे गाव, तेथील शाळा दत्तक घेऊन त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचा मानस व्यक्त केला. संघटनेच्या सर्व योजनांमध्ये सुसूत्रता तसेच विविधता आणून आजीव सभासद आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यासाठी निरनिराळ्या योजना आखण्याचे निश्चित केले आहे. संघटनेच्या भवन उभारणीसाठी भरीव योगदान देण्याचेही त्यांनी जाहीर केले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor kishore kadam attended family physicians association event