शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने राज्यातील शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे. इगतपुरी तालुक्यातील पाडळी देशमुख येथील शेतकरी अंबादास खैरे यांनी आपल्या शेतात पिकविलेल्या कोबी पिकाला केवळ एक रुपया भाव मिळत असल्याने तसेच ते पीक काढण्यासाठी काढणीचा खर्च देखील परवडत नसल्याने पाच एकर क्षेत्रातील कोबी पिकावर नांगर फिरविला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वााच- दोन बोग्यांखालून धूर निघाल्याने प्रवाशांमध्ये भीती; नांदेड-कुर्ला एक्स्प्रेसमधील प्रकार

खैरे यांनी कोबी लागवडीसाठी प्रती एकर ५० हजार रुपये खर्च केला आहे. एकूण पाच एकर कोबी लागवडीसाठी त्यांचा २.५० लाख रुपये खर्च झाला आहे. परंतु, कोबी पिकाला केवळ एक रुपये भाव मिळत असल्याने त्यांनी शासनाचा निषेध नोंदवित आपल्या पाच एकर कोबीवर नांगर फिरविला. राज्यातील कांदा, द्राक्ष यासह विविध शेतमाल पिकविणारा शेतकरी आपल्या शेतमालाला भाव मिळत नसल्याने अडचणीत सापडला आहे. त्यामुळे अनेक शेतकरी आत्महत्या करत आहे. ही अतिशय दु:खाची बाब आहे. शेतकऱ्यांनी कुठल्याही परिस्थितीत खचून न जाता आत्महत्या करू नये. शासनाला आपली दखल घ्यावीच लागणार आहे. शेतकऱ्यांना शासनाने योग्य ती मदत न केल्यास सरकारला त्यांची जागा दाखवून देऊ, असा इशाराही खैरे यांनी दिलाआहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Plow on five acres of cabbage crop due to lack of price in igatpuri nashik dpj