नाशिक : शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळावरील कारवाईदरम्यान उसळलेल्या दंगलीत जमावाने पोलिसांवर लाठ्याकाठ्या घेऊन दगडफेक केली. यात २१ पोलीस अधिकारी व कर्मचारी जखमी झाले. या प्रकरणात १५ ते २० जणांना अटक करण्यात आली. घटनास्थळावरून ७० दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. त्यावरून अन्य संशयितांची ओळख पटविण्यात येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागजी चौक, उस्मानीचा चौक भागात रात्री १२ ते पहाटे दोन या वेळेत जमावाने गोंधळ घातला. नेते, धर्मगुरु आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर दगडफेक केली. जखमींमध्ये सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके आणि नितीन जाधव, वरिष्ठ निरीक्षक युवराज पत्की आणि अवनिश खैरनार, एस. बी. काकडे, व्ही. डी. वालके, उपनिरीक्षक एस. व्ही. नागवडे, ए. एल. जंगले, हवालदार के. वाय. कुवर, पी. एन. कोहक, व्ही. के. जवक, एस. डी. पांडे, आर. एस. जंगलाणे, एम. एम. मुलानी, व्ही. एल. स्पेकरे, एन. आर. जाधव. आर. बी. राठोड, एल. पी. आदवडे, आर. आर. राऊत, इनामदार आदींचा समावेश आहे. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

जमावाविरोधात पोलिसांवर हल्ला करणे, शस्त्र बाळगणे आदी कलमांन्वये मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून व बळाचा वापर करून जमावाला पांगवले. रात्रीपासून संशयितांची धरपकड सुरू केली. आतापर्यंत १५ जणांना अटक झाली असून इतरही काही जणांना अटक करण्यात येत असल्याचे पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी सांगितले. रात्री अनेक जण दुचाकीवर आले होते. लाठीमारानंतर जमावाने पळ काढला. त्यांच्या ७० दुचाकी पोलिसांनी घटनास्थळावरून ताब्यात घेतल्या. या दुचाकीवरून संशयितांची ओळख पटविली जाणार आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suspects searched on 70 bikes seized in nashik riots case registered against mob sud 02