नवी मुंबई: भाजपचे माजी नगरसेवक तथा स्थायी समितीचे माजी सभापती नवीन गवते यांच्यासह सहा जणांविरोधात रबाळे एमआयडीसी पोलिस ठाण्यात “मारहाण करणे धमकी देणे, जातीवाचक शिवीगाळ” केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष काळे यांचा मुलगा ओंकार काळे यांनी तक्रार दाखल केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा- नवी मुंबई: फसवणूक करून लुटमार करणारे सराईत गुन्हेगार जेरबंद

मागील वर्षी ऑगस्ट २०२२ मध्ये गणेशोत्सवात दोन्ही गटात वाद झाले होते. त्यानंतर १९ मार्च २०२३ रोजी याच रागातून गवते समर्थक विरेश सिंग घराजवळ आले असता, जातिवाचक शब्द वापरून वाद उकरला होता. हा प्रकार सुभाष काळे यांना सांगितल्यावर तक्रार अर्ज पोलिसांना दिला होता.याच रागातून यातील आरोपी पैकी एक  रागिणी झा हिने २३ मार्च रोजी पुन्हा भांडण केले होते. हा वाद मिटवण्यासाठी रागिणीच्या माध्यमातून गवते परिवारातील तिघांनी ५० हजारांची खंडणी मागितल्याचे, जातिवाचक शिवीगाळ केल्याचे तक्रारी म्हणण्यात आले होते. या प्रकरणी केवळ पत्र देणेच सुरू असल्याने या बाबत सह पोलीस आयुक्तांशी फिर्यादी यांनी भेट घेऊन व्यथा मांडल्यावर सूत्र हलली आणि गवते यांच्यासह अन्य सहाजणांविरोधात गुरुवारी उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Case has been filed against a total of 6 people including the former chairman of the standing committee mrj