वर्ल्ड कल्चरल डेव्हलपमेंट फाऊंडेशनतर्फे ‘नवी मुंबई फेस्ट २०२३’ या सामाजिक-सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जानेवारी दि.२१ पासून या कार्यक्रमाची सुरवात झाली असून दि. २९ जानेवारीपर्यंत पार पडणार आहे. यादरम्यान आज नवी मुंबईतील सिवूडस मॉलमध्ये तीन दिवस देशातील १४ राज्यांच्या सांस्कृती, कला, परंपरा तसेच खाद्य संस्कृतीची मेजवानी आहे . या नवी मुंबई फेस्टमधून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला जात असून सहभागी १४ राज्यांच्या संस्कृती, कला, परंपरेची नवी मुंबईकरांना दर्शन घडविण्यात येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>नवी मुंबई : फ्लॅटमधून गुटखा विक्री, विक्रेत्यावर कारवाई

‘नवी मुंबई फेस्ट २०२३’हा गेल्या काही दिवसांपासून सुरू करण्यात आला असून. दि.२१ ते २६ पर्यंत खेळ, सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आलेला आहे. दि.२७ जानेवारी पासून दि २९ जानेवारीपर्यंत जल्लोषात पारंपारिक सांस्कृतिक मूल्यांचे आधुनिक जगासोबत एकीकरणाचा संदेश दिला आहे. या उत्सवात महाराष्ट्र, ओडिशा, केरळ, कर्नाटक, गुजरात, यूपी, बिहार, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, पंजाब, तामिळनाडू, हिमाचल प्रदेश इत्यादी सहभागी १४ राज्यांसह त्यांची संस्कृती, नृत्य, फॅशन, खाद्य, क्रीडा, कला, साहित्य आणि टॉक शो प्रदर्शित केले आहेत. शुक्रवारी याची सुरुवात करण्यात आली असून महाराष्ट्राने नेतृत्व केले आहे. पहिल्या दिवशी कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र राज्याच्या महाराष्ट्र गाथा याने सुरुवात करण्यात आली. यामध्ये राज्यातील संतांची परंपरा, दिंडी सोहळा, बळीराजा संस्कृती, वासुदेव , मराठी संगीत-नृत्य संस्कृतीचे दर्शन घडविले.

हेही वाचा >>>नवी मुंबई: एपीएमसीत कांद्याची बंपर आवक, दर गडगडले

वर्ल्ड कल्चरल डेव्हलपमेंट फाऊंडेशनच्या या महोत्सवाच्या माध्यमातून एक भारत श्रेष्ठ ‘भारत’ या संकल्पनेला बळ देण्याचा हा प्रयत्न आहे. यावेळी उपस्थित बेलापूर आमदार मंदा म्हात्रे यांनी हा आयोजित करण्यात आलेल्या नवी मुंबई महोत्सवात विविध राज्यातील परंपरा, संस्कृती दाखविण्यात आली. यातुन पुढच्या पिढीला भारत देशाच्या राष्ट्रीय एकात्मता आणि त्या-त्या राज्याच्या सांस्कृतिविषयी माहिती दिली जात आहे, हे अभिमानास्पद आहे. यापुढे ही नवी मुंबई शहरात असे राष्ट्रीय एकात्मता दर्शन घडविणारे कार्यक्रम झाले पाहिजेत.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Message of national unity from navi mumbai festival amy