तळोजा येथील सिद्धी करवले गावामधील एका गोठय़ामध्ये पोलिसांनी छापा टाकून ६० हजार रुपये किमतीच्या बनावट मद्यसाठय़ासह दुकलीला गुरुवारी पहाटे अटक केली. रवींद्र पाटील आणि योगेश पाटील अशी या आरोपींची नावे आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून पाटीलबंधूंचा हा धंदा चालू होता. भंगार व्यावसायिकांकडून दारूच्या रिकाम्या बाटल्या विकत घेऊन गोव्याहून आणलेल्या रियल नावाच्या दारूच्या बाटलीतील दारूमध्ये पाण्याचे मिश्रण करून बनावट मद्य बनविले जात होते. या मद्याच्या बाटल्या कंपनीच्या असल्याचे भासविण्यासाठी बाटलीचे झाकण सील करण्याचे यंत्रही त्यांनी आणले होते. तळोजा परिसरातील रस्त्यालगतचे ढाबे, हॉटेल आणि मजुरांमध्ये या दारूची विक्री होत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two people arrested from taloja for making a fake wine